महाराष्ट्रात करोनाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्याप धोका टळला नाही. राज्यसरकार अजूनही कोविड नियम पाळण्याचे आदेश जनतेला देत आहे. असे असताना मध्यंतरी बंद असलेली मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (byculla zoo) 10 फेब्रुवारीपासून पुन्हा पर्यटकांसाठी (zoo starts from tenth February) खुले होणार आहे. मात्र, कोरोनाचा धोका पाहता नियम (corona) पाळणे अनिवार्य आहे. आणि पर्यटकांची गर्दी वाढू लागल्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने 80 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण (corona vaccination) झालेल्या शहरीतील कोविडचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यापैकी मुंबई हे शहर आहे. त्यामुळे आता मुंबईलाही दिलासा मिळाला असून राणीची बागही खुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पर्यटकांच्या उत्साहाचा अंदाज घेता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असून 39 खासगी सुरक्षा रक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय खुले राहणार आहे. दरम्यान, पर्यटकांची संख्या क्षमतेपेक्षा वाढली तर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटचे परिणाम पाहता ४ जानेवारीपासून प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले होते. आता पुन्हा मुंबईतील राणीची बाग पर्यटकांसाठी खुली होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.