Maharashtra Police: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी (ATS) पंजाबस्थित गुंड सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना ठाण्यातून अटक केली. पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एटीएसने रविवारी संध्याकाळी ठाण्यातील कल्याण येथून तीन आरोपींना अटक केली.
तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदाच्या संपर्कात होते. दरम्यान, महाराष्ट्रात घातपाताचा कट रचला जात असल्याची कबुली अटक झालेल्या या दहशतवाद्यांनी दिली आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
धीरुभाई अंबानी स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी
एका अज्ञात कॉलद्वारे मुंबईमधील (Mumbai) धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला (Dheerubhai Ambani International School, Mumabi) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता सुमारास शाळेच्या लँडलाईनवर पोलिसांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉल लगेच डिस्कनेक्ट झाला. दरम्यान, फोन करून धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु आहे. तसेच, मुंबई पोलिस देखील सतर्क झाले आहेत.
दरम्यान, , पंजाब पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करत ATS अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आंबिवलीच्या NRC कॉलनीत सापळा रचला होता.
यावेळी गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदाच्या संपर्कात असणाऱ्या शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमरदीप कुमार यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ निर्माण झाली असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.