"Congress will come to power in 2024"
"Congress will come to power in 2024"Dainik Gomantak

"2024 मध्ये काँग्रेसचंच सरकार येणार"

कारण सत्तेत असलेला काँग्रेस पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. याचमुळे महाविकासआघाडीत धुसपूस चालू आहे
Published on

मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नवीन वळण येणार का ? असे चित्र सध्या दिसत आहे. कारण सत्तेत असलेला काँग्रेस(Congress) पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. याचमुळे महाविकासआघाडीत धुसपूस चालू आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून अद्याप असे काही ठरले नसल्याचे सांगत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी 2024 मध्ये राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे सांगत राजकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आणला आहे.

त्यात रणनितीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांची घेटलेली भेट देखील महत्त्वपूर्ण आहे. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, 2024 मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणारच. कारण, आज देशामध्ये भाजपाला पर्याय फक्त काँग्रेसच आहे. लोक भाजपाला कंटाळले आहेत. नरेंद्र मोदींनी तर देशच विकायला काढला असल्याची जहरी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

"Congress will come to power in 2024"
राहुल गांधी आतातरी जबाबदारी स्वीकारतील का?

काल शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठीकीत काँग्रेसचे दिल्लीतील नेते तसेच बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीत स्वतः प्रदेशध्यक्ष न दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ही बैठक ओबीसी आरक्षणाबत होती आणि त्या बैठकीचे निमंत्रण माला नव्हते म्हणून मी गेलो नाही असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्रातील माणूस जर राष्ट्रपती होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असे सांगत शरद पवार यांच्या नावालाही त्यांनी पसंती दर्शवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com