राहुल गांधी आतातरी जबाबदारी स्वीकारतील का?

काँगेसला(Congress) २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर काँगेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत
Will Rahul Gandhi  agree to lead Congress in LokSabha
Will Rahul Gandhi agree to lead Congress in LokSabhaDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीत(Delhi) आज संध्यकाळी होणाऱ्या काँग्रेसच्या(Congress) संसदीय मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण याच बैठकीत राहुल गांधी(Rahul Gandhi) लोकसभेत(Loksabha) कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यास राजी असतील की नाही आणि नेतृत्व पदे सांभाळण्यास आणि सर्वोच्च स्थानातील पोकळी भरुन काढणार की परत जिम्मेदाररी घ्यायला टाळाटाळ करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Monsoon Session)

अधीर रंजन चौधरी यांच्या जागी नवीन नेता घेऊन पुढच्या आठवड्यात सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेस सरकारला अनेक मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

पंजाबचे खासदार मनीष तिवारी आणि रवनीत बिट्टू, तसेच शशी थरूर, गौरव गोगोई आणि उत्तम रेड्डी हे दावेदार आहेत, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधीच या पदावर येतील असे सांगितले जात आहे.

Will Rahul Gandhi  agree to lead Congress in LokSabha
राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक,अधिवेशनाची तयारी

२०१२ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यतेची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे अनेकांचे मत आहे, असे काँग्रेस मधीलच काही नेत्यांना वाटत आहे अशी माहिती समोर येत आहे.

जर राहुल गांधी यांनी लोकसभेच्या संसदीय मंडळाच्या नेतृत्वापासून दूर राहण्याचा घेतला तर कॉंग्रेसला चौधरी यांच्या जागी नेमके कुणाला नेमायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. जर तसे झाले तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाब नेत्यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता नाकारता यात नाही.

सध्या देशात काँगेसची अवस्था बिकट झालेली पाहायला मिळत आहे, नुकत्याच झालेल्या जवळपास साऱ्या विधानसभा निवडणुकीत काँगेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे त्यातच काँगेसला २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर काँगेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यातच लोकसभेतही विरोधी पक्षाचे बहुमत नसल्याने विरोधी पक्षनेते पदही रिकामे आहे अशातच लोकसभेत प्रबळ संख्याबळ आणि नेता नसल्याने विरोधी पक्ष पोकळा झालेला दिसत आहे.

आता आज होणाऱ्या काँगेसच्या बैठकित तरी काँगेसला नवीन नेता मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com