Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या तारखेत बदल

आता 3 आणि 4 जुलैला विशेष अधिवेशन होणार, 4 जुलैला विश्वासदर्शक ठराव घेण्यात येणार आहे.
Maharashtra Legislative Assembly
Maharashtra Legislative Assembly Dainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Politics News: महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळानंतर भाजपने धक्कादायक निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली, महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन 2 जुलैपासून सुरू होणार होते, मात्र हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलेले असून, ते आता 3 आणि 4 जुलैला विशेष अधिवेशन होणार, 4 जुलैला विश्वासदर्शक ठराव घेण्यात येणार आहे.

(Change in the date of session of Maharashtra Legislative Assembly)

Maharashtra Legislative Assembly
'मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय की...'

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे, असे शिंदे यांच्या हवाल्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. "आम्ही नागरिकांच्या विश्वासावर जगले पाहिजे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान आले नसले तरी अधिवेशनादरम्यान विश्वासदर्शक ठरावही होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विकास प्रकल्पांना गती देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले.

Maharashtra Legislative Assembly
गोव्यात बरसणार मुसळधार सरी जाणून घ्या, कोकणासह महाराष्ट्रातील स्थिती

निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे, असे शिंदे यांच्या हवाल्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. "आम्ही नागरिकांच्या विश्वासावर जगले पाहिजे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अनुभवी नेते मंत्रिमंडळात असल्याने त्यांच्या प्रशासनाला मदत होईल, असेही शिंदे म्हणाले. मेट्रो आणि समृद्धी द्रुतगती मार्ग प्रकल्पांना गती द्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस यांनी नोकरशाहीला प्रशासकीय निर्णय लवकर घेण्यास सांगितले, असे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू असलेल्या पेरणीच्या कामांचा आढावाही घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com