'मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय की...'

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे यांनी मराठीतून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली होती. आपण स्वतः सरकारमध्ये नसून सरकारला बाहेरुन मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, नंतर जेपी नड्डा स्वतः मीडियासमोर आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी पक्षाची इच्छा असल्याचे सांगितले. (Eknath Shinde has been sworn in as the Chief Minister of Maharashtra)

उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती

महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी जात असताना आमदारांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीयही शपथविधीनिमित्त राजभवनात पोहोचले. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र शिवसेनेचे आमदार शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. खरे तर बंडखोर आमदार सध्या गोव्यातील हॉटेलमध्ये आहेत. मात्र, शपथविधीदरम्यान त्यांनी गोव्यातील हॉटेलमध्येच आनंदोत्सव साजरा केला. शपथविधीला भाजप नेते पोहोचले.

Eknath Shinde
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्याचं आम्हालाही दु:ख- एकनाथ शिंदे

जेपी नड्डा म्हणाले - फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, 'मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे मन दाखवले आहे. मात्र, आम्ही फडणवीस यांना सरकारमध्ये राहून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.'

Eknath Shinde
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे म्हणाले – देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस मिळणे कठीण आहे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस हे संख्येच्या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. त्यांचे स्वतःचे 106 आमदार आहेत, पण त्यांनी मोठ्या मनाने बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस मिळणे कठीण आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शिवसैनिकाला संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) 40 आमदारांसह एकूण 50 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही आजवर ही लढाई लढली आहे. या 50 लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्या सर्वांचेही मी आभार मानतो. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना साथ दिली आहे.'

मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, 'बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेण्यासाठी मी काम करणार आहे. सर्व 50 आमदार एकत्र आहेत. आमच्या विधानसभा मतदारसंघातील समस्या आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितल्या. मात्र आमच्या बोलण्याकडे मुख्यमंत्र्यांनी कधीच फारसे लक्ष दिले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com