महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी अखेर वसंत मोरेंना भेटायला बोलावले आहे. त्यांची भेट सोमवारी सकाळी 11.30 वाजता शिवतीर्थावर होणार आहे. दरम्यान, मोरेंना राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही फोन आला होता. मात्र, मोरेंनी आपण 'मानसे'तच थांबणार असल्याचे बच्चू कडू यांना सांगितले. (MNS chief Raj Thackeray to meet Vasant More on monday)
वसंत मोरे यांना काही दिवसांपूर्वी पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवले होते. त्यांना गेल्या पाच सहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत. मात्र, त्यांनी मनसेतच राहण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी देखील मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. रुपाली पाटील यांनी मोरे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे कधीही स्वागत आहे. तसेच मोरेंनी आधीच हा निर्णय घेतला असता, तर आज मोरेंवर अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची दुर्देवी वेळ आली नसती, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
वसंत मोरे यांच्या पक्षात येण्याने पालिका निवडणुकीत ताकद वाढणार आहे. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना आपल्या पक्षात घेण्यास जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे. मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.
शिवसेना भावनाबाहेर हनुमान चालिसाचे पठण
महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून वाद वाढत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रामनवमीनिमित्त शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले. यासंदर्भातील काही छायाचित्रेही समोर आली आहेत. त्यानंतर शिवसेना (Shiv Sena) भवनाबाहेर पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.