काही पक्षांमध्ये अल्प बुध्दीचे लोक असतात...: देवेंद्र फडणवीस

मविआ मुळेच जनतेमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याचं देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) कोल्हापूरात कौतूक करण्यात आलं, यावेळी पृथ्वीराजला 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले. दरम्याण पत्रकांरांशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मविआ वर सडकून टिका केली आहे. (Devendra Fadnavis said that some parties have people with low intelligence)

Devendra Fadnavis
अनिल देशमुखांची जप्त केलेली संपत्ती परत करा; सर्वोच्च न्यायालयाचा 'ईडी'ला आदेश

त्यावेळी चे म्हणाले की, हे मविआचे सरकार स्वत:पलिकडे कधीही जाऊ शकत नाही, ह्या महाविकास आघाडीने कोल्हापुरात काहीही विकास केला नाही सर्व विकास हा भाजपने केला आहे, मविआ मुळेच जनतेमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. आई आंबाबाईच्या कृपेने यावेळीही कोल्हापुरात भाजपचाच विजय होणार. नाना कदम हे भाजपचे 107वे आमदार म्हणून निवडून येणार असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

शिवसेनेच सगळ मतदार भाजप सोबत असणार आहे. सत्ताधाऱ्याविरोधात लोकांमध्ये असंतोश पसरला गेला आहे. पुढे बोलताना फडणवीसांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर फडणवीसांनी टीका करत म्हणाले की, नाना पटोलेंना भगव्याचा जरा जास्तच तिटकारा आहे पण भाजप त्या भगव्याला नेहमी घेऊनच पुढे जाणार, आणि भापजचा 'भगवा' श्वास आहे. कायमचं भाजपचा श्वास आणि विकास भगवा राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com