Atiq Ahmed Death Case: अतिक-अश्रफला 'शहीद' संबोधणारे झळकले बॅनर, पोलिसांनी केली मोठी कारवाई

Atiq Ahmed: गॅगस्टर अतिक अहमद आणि त्याचा माजी आमदार भाऊ अश्रफ अहमद यांना 'शहीद' संबोधणारे बॅनर लावल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmed Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed Death Case: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात माजी खासदार आणि माफिया गॅगस्टर अतिक अहमद आणि त्याचा माजी आमदार भाऊ अश्रफ अहमद यांना 'शहीद' संबोधणारे बॅनर लावल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ही घटना मंगळवारी जिल्ह्यातील माजलगाव येथे घडली, त्यानंतर अनेक स्थानिक बॅनरजवळ जमले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी तातडीने हे बॅनर हटवले.

दरम्यान, बॅनर लावून अतिक आणि त्याच्या भावाला शहीद म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात दोन्ही भावांच्या हत्येसाठी एका विशिष्ट समाजाला अपमानास्पद संबोधण्यात आलेले वृत्तपत्राचे कटिंगही होते.

ते म्हणाले की, पोलिसांनी (Police) भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmed Murder Case: कुठे आहे आतिकची पत्नी आणि गुड्डू मुस्लिम? यूपी एसटीएफने सांगितला अॅक्शन प्लॅन

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, वृत्तपत्राच्या संपादक आणि रिपोर्टरवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अतीक (60) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथे 15 एप्रिलच्या रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, जेव्हा पोलीस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात होते.

हत्येप्रकरणी पाच पोलीस निलंबित

दुसरीकडे, पोलीस कोठडीत अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी शहागंज पोलीस ठाण्याचे एसएचओ अश्वनी कुमार सिंग यांच्यासह पाच पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

अतिक आणि अश्रफ हत्याकांडप्रकरणी शहागंज पोलीस ठाण्याचे एसएचओ अश्वनी कुमार सिंग, एक उपनिरीक्षक आणि तीन हवालदारांना बुधवारी निलंबित करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

एसआयटीच्या तपासात जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा आढळून आल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Atiq Ahmed Murder Case
Atiq Ahmad: 'माझा ISI आणि लष्कर-ए-तैय्यबाशी थेट संबंध...', माफिया अतिक अहमदचा मोठा गौफ्यस्फोट

विशेष म्हणजे, शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलीस कोठडीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यावेळी पोलिसांनी त्यांना शहागंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कॅल्विन हॉस्पिटलच्या आवारात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. केल्विन हॉस्पिटलपासून काही अंतरावर शहागंज पोलिस स्टेशन आहे.

दुसरीकडे, या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

अन्य दोन सदस्यांमध्ये एसीपी कोतवाली सतेंद्र प्रसाद तिवारी आणि निरीक्षक (इन्व्हेस्टिगेशन सेल, गुन्हे) ओम प्रकाश यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com