Atiq Ahmad: 'माझा ISI आणि लष्कर-ए-तैय्यबाशी थेट संबंध...', माफिया अतिक अहमदचा मोठा गौफ्यस्फोट

Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयाने माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Atiq Ahmad
Atiq AhmadDainik Gomantak
Published on
Updated on

Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयाने माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या 43 वर्षांत अतिक अहमदवर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, पोलिसांचे (Police) आरोपपत्रही समोर आले असून, त्याआधारे रिमांडची मागणी करण्यात आली आहे. माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमदने रेकॉर्ड केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्याचे पाकिस्तानशी थेट संबंध आहेत. त्याचे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाशी संबंध आहेत.

Atiq Ahmad
Sachin Pilot in Delhi: काँग्रेस सोडणार की नवा पक्ष काढणार? सचिन पायलट यांच्या निर्णयाकडे लक्ष

पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे शस्त्रे टाकली जातात

अतिक म्हणाला की, 'माझ्याकडे शस्त्रांची कमतरता नाही. कारण माझे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी (Terrorist) संघटना लष्कर-ए-तैय्यबाशी थेट संबंध आहेत. ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानकडून पंजाब सीमेवर शस्त्रे टाकली जातात आणि माझी लोक गोळा करतात.'

झाशीमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद ठार

उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमदचा फरार मुलगा असद याला एसटीएफच्या पथकाने झाशीमध्ये चकमकीत ठार मारले. असदसोबत शूटर गुलामही मारला गेला आहे.

या दोघांवर सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. असदवर उमेश पालच्या हत्येचा पहिला गुन्हा होता, त्यानंतर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Atiq Ahmad
Video: लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप पुन्हा चर्चेत, हॉटेल मॅनेजरने गुडघ्यावर बसून...

एसटीएफशी सामना

अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात वॉन्टेड होते. दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.

झाशीमध्ये, डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीएसटीएफ टीमने चकमकीत दोघांना ठार केले. या दोघांकडून अत्याधुनिक विदेशी शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे यूपी एसटीएफकडून सांगण्यात आले आहे.

असदच्या तीन सहाय्यकांना दिल्लीत अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अतिक अहमदचा मुलगा असद याला मदत केल्याप्रकरणी आणि उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

जावेद, खालिद आणि झीशान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तपासादरम्यान खालिद आणि झीशान यांनी उघड केले की, त्यांनी कुख्यात उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद आणि गुलाम यांना आश्रय दिला होता.

Atiq Ahmad
गर्लफ्रेंडने आधी ब्रेकअप केले, नंतर लग्नास नकार..., चिडलेल्या तरुणाने चाकूने भोसकले; 4 वर्षांच्या नात्याचा वेदनादायी अंत

अतिक आणि अश्रफ हे 13 ते 17 एप्रिलपर्यंत कोठडीत राहणार आहेत

प्रयागराजमध्ये डीजीसी क्रिमिनल गुलाब चंद्र अग्रहरी यांनी सांगितले की सीजेएम कोर्टाने आरोपी अतिक अहमद आणि अशरफ यांना 13 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. कोठडीत ठेवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com