Atiq Ahmed Murder Case: कुठे आहे आतिकची पत्नी आणि गुड्डू मुस्लिम? यूपी एसटीएफने सांगितला अॅक्शन प्लॅन

Atiq Ahmed Murder Case: माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन आणि गुड्डू मुस्लिम यांना अद्याप अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलेले नाही.
Shaista Parveen & Guddu Muslim
Shaista Parveen & Guddu Muslim Dainik Gomantak
Published on
Updated on

Atiq Ahmed Murder Case: माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन आणि गुड्डू मुस्लिम यांना अद्याप अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलेले नाही. दोघांना पकडण्यासाठी मोहीम सुरु आहे.

एसटीएफचे डीआयजी अनंत देव तिवारी यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर गुड्डू मुस्लिमचे नाव चर्चेत आहे.

अश्रफने मरण्यापूर्वी शेवटच्या वेळी गुड्डू मुस्लिमचे नावही घेतले आहे. असद आणि गुलामची माहिती गुड्डू मुस्लिमने पोलिसांना दिली होती, असेही बोलले जात आहे.

अटकेचे प्रयत्न सुरु आहेत

एसटीएफच्या डीआयजीने सांगितले की, गुड्डू मुस्लिम आणि शाइस्ता यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. सर्व पथके या कामात गुंतली आहेत. त्याला लवकरच अटक (Arrested) करु, असेही ते म्हणाले.

यापूर्वी, एसटीएफचे आयजी अमिताभ यश म्हणाले की, गुड्डू हा अतिशय धोकादायक गुन्हेगार आहे आणि तो एक प्रोफेशनल शूटर देखील आहे.

Shaista Parveen & Guddu Muslim
Atiq Ahmed Murder Case: साबरमतीच्या तुरुंगातून बिल्डरला दिली होती धमकी; दोन प्रकारच्या पावत्या..

अमिताभ यश यांच्या म्हणण्यानुसार, गुड्डू मुस्लिमला 1999 मध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

त्यावेळी त्याने अतिकच्या वकिलाच्या मदतीने जामीन मिळवला होता. गुड्डू बॉम्ब बनवण्यातही निपुण असल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ यांनी पुढे सांगितले की, जेव्हा उमेश पालची हत्या झाली तेव्हा सीसीटीव्हीमध्ये मी त्याला सहज ओळखले.

Shaista Parveen & Guddu Muslim
Atique Ahmed Murder Case: अतिक अहमद हत्याकांडाबाबत मोठी अपडेट, शूटर्संना पिस्तूल देणाऱ्या...

कोल्विनसमोर खून

विशेष म्हणजे, शनिवारी अतिक आणि अश्रफ यांची हत्या करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या वेशात आलेल्या तीन तरुणांनी पोलिसांसमोर (Police) दोघांवर गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी, दोघेही मीडियाशी बोलत होते. दरम्यान, अश्रफ म्हणाला की, मुख्य म्हणजे गुड्डू मुस्लिम आहे…. शूटर्संनी गोळीबार सुरु केल्याने त्याला आपले वाक्यही पूर्ण करता आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com