AI In Agriculture: 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना बळकटी देईल', बारामती एआय शेतीची 'मस्क'नी घेतली दखल

Elon Musk On Agriculture AI Project In Baramati: बारामतीतील AI प्रकल्प भविष्यात देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल; सत्या नाडेला
Elon Musk On Agriculture AI Project In Baramati
Elon Musk
Published on
Updated on

बारामती : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून आधुनिक शेती करत आहे. मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड, बिल गेट्स फाउंडेशन यांच्या मदतीने सुरु असलेल्या या शेतीची दखल टेस्ला व स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी देखील घेतली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर मस्क यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना बळकटी देईल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीने शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतेय. एआयचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती करणे शक्य असल्याचे कंपनीने सिद्ध केले आहे. बारामतीतील हा प्रकल्प भविष्यात देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशी आशा ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी दिल्ली व्यक्त केली.

Elon Musk On Agriculture AI Project In Baramati
Goa Viva Carnival 2025: शनिवारपासून गोव्यात 'किंग मोमो'ची राजवट; सुरु होणार कार्निव्हलचा जल्लोष

सत्या नाडेला यांनी याबाबत व्हिडिओ सोशल मीडिया एक्सच्या माध्यमातून शेअर केला आहे. नाडेला यांनी शेअर केलेला व्हिडिओची दखल मस्क यांनी घेतली आहे. मस्क यांनी नाडेला यांचा व्हिडिओ रिपोस्ट करत, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना बळकटी देऊ शकतं’, अशी प्रतिक्रिया दिलीय.

Elon Musk On Agriculture AI Project In Baramati
Marathi Konkani Dispute: 'गोव्यात मराठी - कोकणी वाद राहिलेला नाही, कायम राहणार सहभाषा'; CM सावंत यांचे स्पष्टीकरण

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती शक्य आहे, ही बाब ऊस पिकाच्या माध्यमातून ट्रस्टने सिद्ध केली आहे. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, डॉ. अजित जावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. इलॉन मस्क यांनी याची दखल घेणे ही बाब आशादायक आहे.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार

कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम जगभरातील कृषी क्षेत्रावर होतील, याची कल्पना इलॉन मस्क यांना असल्याने त्यांनी बारामतीतील प्रकल्पाची आपणहून दखल घेतली. यातून या प्रकल्पाला जागतिक मान्यताही मिळू लागल्याचे स्पष्ट होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातत्याने प्रशिक्षण व संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्याने हे शक्य झाले. प्रकल्पाचे महत्त्व हळूहळू सर्वांना समजू लागले आहे.

प्रतापराव पवार, विश्वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com