Marathi Konkani Dispute: 'गोव्यात मराठी - कोकणी वाद राहिलेला नाही, कायम राहणार सहभाषा'; CM सावंत यांचे स्पष्टीकरण

Marathi Language Issue In Goa: गोव्यात सुरु असलेला मराठीवरील अन्याय केंद्र सरकारने दूर करावा, असा ठराव दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आला.
Goa CM Pramod Sawant On Konkani Marathi Dispute
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Konkani vs Marathi in Goa

साखळी: "गोव्यात कोकणी राज्यभाषा तर मराठी सहराज्यभाषा असून दोन्ही भाषा समानतेने चालत आहेत. दोन्ही भाषांचे महत्त्व अबाधित असून कोणाताही वाद नाही. केवळ गोव्यात परप्रांतीय लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नोकरीसाठी कोकणी सक्तीची करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात मराठीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नाही", असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोवा मराठी अकादमी व साखळी रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सृजन संगम या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नोकरभरतीत कोकणी भाषा सक्तीची केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर मराठीप्रेमींकडून झालेल्या टिकेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Goa CM Pramod Sawant On Konkani Marathi Dispute
Oops... No Internet! गोव्यात इंटनेटसेवा विस्कळीत; वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कापली चुकीची केबल

"समाजात वावरत असताना आपले भविष्य घडवत असताना आपल्यावर चांगले संस्कार असणे आवश्यक आहे. खुप पैसा आहे, पण संस्कार नाही. तर त्या पैशाचा काय फायदा ? त्यासाठी संस्कार व मनशांती महत्वाची आहे. मराठी ही संस्काराची भाषा आहे. आपणावर तसेच मुलांवर लहान वयातच संस्कार रूजविण्याची क्षमता या भाषेत आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.

माझे देखील बारावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून झालं असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 'पैशेच म्हणजे सर्वस्व नाहीए, संस्कार देखील महत्वाचे आहेत. योग्य संस्कार झाले नसतील तर लोक वेगळ्या मार्गाला देखील जातात. मराठी ही संस्काराची भाषा आहे.'

'गोव्यात मराठी आणि कोकणी वाद राहिलेला नाही. कोणाला मराठीतून व्यवहार करायचा असेल तर त्याला कोणीच अडवलेलं नाही. कोकणी राज्यभाषा असली तर मराठी कायम सहभाषा राहणार आहे. गोव्याला मराठीची मोठी परंपरा आहे. ती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी वाचन, लिखाण आणि चिंतन करावे लागेल', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa CM Pramod Sawant On Konkani Marathi Dispute
Rent a Cab Goa: "आठ दिवसांत नोटीस मागे घ्या किंवा परिणामांना सामोरे जा";रेंट-अ-कॅब व्यावसायिकांचा परिवहन विभागाच्या आदेशाला विरोध

दरम्यान, "गोव्यातील नोकरभरती आयोगाच्या परिक्षांमध्ये कोकणीसह मराठीला स्थान न देणे अन्यायकारक आहे. या एकांगी निर्णयामुळे गोव्याची सर्वांगीण हानी होतेय. गोव्यात सुरु असलेला मराठीवरील अन्याय केंद्र सरकारने दूर करावा, असा ठराव दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी मांडण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मराठीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नसल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com