Narayan Rane Vs Ajit Pawar: अजितदादा म्हणाले, राणेंना बाईनं पाडलं... त्यावर राणेंनी दिला 'हा' इशारा...

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला रंगत
Narayan Rane Vs Ajit Pawar
Narayan Rane Vs Ajit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

Narayan Rane Vs Ajit Pawar: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. नुकत्याच येथील एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंच्या दोन वेळा झालेल्या पराभवावरून त्यांची खिल्ली उडवली होती.

त्यावर पत्रकारांनी राणेंना प्रतिक्रिया विचारल्यावर राणेंनी अजित पवार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या नादाला लागू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवेन, असा इशारा राणे यांनी अजित पवारांना दिला आहे.

Narayan Rane Vs Ajit Pawar
Maharashtra: "तेरे बिना जिया जाये ना" उदयनराजेंचा वेगळा अंदाज

या दोन्ही मतदारसंघात मूळचे भाजपचे उमेदवार निवडून आले होते. कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे.

नुकतेच एका प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, शिवसेनेला ज्या ज्या लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना फटका बसला. आत्ता आमच्यासोबत असलेल्या भुजबळ साहेबांनी शिवसेनेतून स्वतःसह 19 जणांना फोडले.

त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्वांना लोकांनी पराभूत केले. नारायण राणेंनी शिवसेना फोडली. पण त्यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेलेही पडले.

Narayan Rane Vs Ajit Pawar
Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले आणि एकदा मुंबईत बांद्रा का कुठे उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडले. बाईनं पाडलं बाईनं. ही त्यांची परिस्थिती. आणि काय मोठा टेंभा मिरवतात ही लोकं.

यांचं काही खरं नाही. यांचा काही विचार करू नका. पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर हे तुमचे माझे आहे. जे काही आहे ते आपले ते आपलेच आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, या टीकेविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारले असता ते म्हणाले की, अजितदादांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं मला माहित नाही. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही.

ते ज्या प्रकारचे राजकारणी आहेत, त्याबद्दल काही बोलू नये. त्यांनी दुसऱ्याला नावे ठेऊ नयेत. त्यांनी दुसऱ्यांची बारशी करायला जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com