कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे. कमिन्सने बुधवारी (6 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध 14 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. राहुलने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते. (KKR batman Pat Cummins hits fastest half century in IPL history)
कमिन्सने 15 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि सहा षटकार ठोकले. त्याने नाबाद 56 धावा केल्या. यादरम्यान कमिन्सचा स्ट्राइक रेट 373.33 होता. डॅनियल सॅम्सच्या एका षटकात त्याने 35 धावा केल्या.
डॅनियल सॅम्सच्या एका षटकात 35 धावा
कमिन्स फलंदाजीला आला तेव्हा कोलकाताला विजयासाठी 41 चेंडूत 61 धावा करायच्या होत्या. त्याने 14व्या षटकातील पाचव्या चेंडूवर टायमल मिल्सला षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. जसप्रीत बुमराहच्या 15व्या षटकात कमिन्सने षटकार आणि चौकार मारले. बुमराहच्या षटकानंतर कोलकाताला विजयासाठी पाच षटकांत 35 धावा हव्या होत्या. डॅनियल सॅम्स गोलंदाजीला आला. पॅट कमिन्सने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर एक षटकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पाचव्या चेंडूवर सॅम्सने नो-बॉल टाकला. यावर एकूण तीन धावा झाल्या. सॅम्सला पाचवा चेंडू पुन्हा टाकावा लागला. यावर कमिन्सने चौकार मारला. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला.
कोलकाताने मुंबईवर पाच गडी राखून मात केली
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने (MI) 20 षटकांत 4 बाद 161 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 52, तिलक वर्माने 38, डेवाल्ड ब्रेविसने 29 आणि किरॉन पोलार्डने 22 धावा केल्या. कोलकाताकडून पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने 16 षटकांत 5 गडी गमावत 162 धावा करून सामना जिंकला. त्यासाठी कमिन्सने नाबाद 56 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने 50 धावांची नाबाद खेळी खेळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.