कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का, पाच बॉलमध्ये दाखवून दिली पोलार्डची पावर

आपल्या फॅन्सचं म्हणण काल कायरन पोलार्डन खरं करून दाखवलं. पोलार्डने अजूनही आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं.
kieron pollard
kieron pollardTwitter
Published on
Updated on

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 14 व्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सचा सामना केकेआरशी झाला. केकेआरने 5 वेळच्या चॅम्पियन मुंबईचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने (KKR) 5 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. या संघात कायरन पोलार्ड (kieron pollard) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हुकूमी एक्का आहे. मात्र असे असले तरी त्याच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

त्याचे कारण राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने गोलंदाजी आणि फलंदाजीत संघाला निराश केलं होतं. सामना रोमांचक परिस्थितीत असेल किंवा करो या मरो स्थितीत येवून पोहचला असेल तर, पोलार्ड चौकार-षटकारच मारणार अशी हमखास गॅरेंटी असते. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तो जुना पोलार्ड प्रेक्षकांना दिसला नव्हता. त्याचं वाढलेलं पोट पाहून फिटनेसबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे आता तो पोलार्ड राहिला नाही, असं मुंबई इंडियन्सच्या काही फॅन्सच मत आहे.

kieron pollard
IPL 2022 VIDEO: आरसीबीनं विजयानंतर केलं दांडगं सेलिब्रेशन

आणि आपल्या फॅन्सचं म्हणण काल कायरन पोलार्डन खरं करून दाखवलं. पोलार्डने अजूनही आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं. त्याने केकेआरकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सची गोलंदाजी जोरदार झोडून काढली. त्याने पॅट कमिन्सच्या शेवटच्या षटकात दमदार 23 धावा केल्या. जेव्हा कमिन्स 20वा ओव्हर टाकत होता तेव्हा पोलार्डने त्याच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स मारला. त्यानंतर त्याच ओव्हरमधले शेवटचे दोन चेंडूही त्याने प्रेक्षक गॅलरीत पाठवले. आणि अशा प्रकारे पोलार्डने पाच चेंडूत 22 धावा करत कमिन्सचा ओव्हर चांगलाच गाजवला.

IPL 2022 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने 5 गडी राखून विजय मिळवला. पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 4 बाद 161 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने 16व्या षटकात लक्ष्य गाठले. पॅट कमिन्सने कोलकाताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने डॅनियल सॅम्सच्या षटकात फलंदाजी करताना 35 धावा केल्या.

kieron pollard
राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, 2 करोड वाला गोलंदाज IPL 2022 मधून बाहेर

कोलकात्याच्या डावाचे 15 वे षटक संपले तेव्हा केकेआरला सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूत 35 धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने डॅनियल सॅम्सकडे चेंडू सोपवला आणि त्याच्यासमोर पॅट कमिन्स होता. कमिन्स 16 व्या षटकातच सामना संपवेल असे क्वचितच कोणाला वाटले असेल. यादरम्यान त्याने असे केले जे आयपीएलच्या इतिहासात फार कमी घडले आहे. कमिन्सने सॅम्सच्या षटकात फलंदाजी करताना 4 षटकारांसह 2 चौकारही मारले. सॅम्सचा पाचवा चेंडू नो बॉल होता ज्यावर 2 धावा झाल्या. अशाप्रकारे आक्रमक फलंदाजी करताना केकेआरने 16व्या षटकात सामना जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com