IND vs ENG ODI: सौरव गांगुलीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी करायला किंग कोहली सज्ज! मैदानात पाऊल ठेवताच रचणार इतिहास; इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका गाजवणार

Virat Kohli 300th ODI Innings Record: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटचा रनमशीन विराट कोहली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आतिषबाजी करण्यासाठी सज्ज झाला.
Virat Kohli 300th ODI Innings Record
Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli 300th ODI Innings Record: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटचा रनमशीन विराट कोहली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आतिषबाजी करण्यासाठी सज्ज झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद स्टार फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असले, तरी सर्वांच्या नजरा प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीवर खिळल्या आहेत.

कोहली बऱ्याच महिन्यांनंतर मैदानात परतत असल्याने चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि रोमांच पाहायला मिळत आहे. या पुनरागमनासोबतच विराट कोहली एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला असून, आगामी सामन्यात फलंदाजीला उतरताच तो भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.

Virat Kohli 300th ODI Innings Record
Virat Kohli Test Comeback: टेस्ट क्रिकेटमध्ये परतणार की नाही? विराट कोहलीच्या एका वक्तव्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम Watch Video

विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 311 वनडे सामने खेळले असून, त्यापैकी 299 सामन्यांमध्ये त्याने प्रत्यक्ष फलंदाजी केली. याचाच अर्थ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल, तेव्हा ती त्याच्या वनडे कारकिर्दीतील 300 वी इनिंग ठरणार आहे. भारताच्या मोजक्याच दिग्गज खेळाडूंना वनडे क्रिकेटमध्ये 300 किंवा त्याहून अधिक डावांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत 311 सामने खेळून 300 व्या डावानंतर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता विराट नेमकी गांगुलीच्या याच आकड्याशी बरोबरी करणार आहे.

Virat Kohli 300th ODI Innings Record
Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

या विक्रमाव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा महारेकॉर्ड करण्याच्या अगदी जवळ पोहोचला. त्याने 311 सामन्यांमध्ये तब्बल 14,797 धावा ठोकल्या आहेत. म्हणजेच 15 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला अवघ्या 203 धावांची गरज आहे. जर या मालिकेत कोहलीची बॅट तळपली, तर तो याच मालिकेत हा पराक्रम करु शकतो. असे झाल्यास तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 15 हजार धावांचा विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचेल.

Virat Kohli 300th ODI Innings Record
Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

यापूर्वी जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत निवड होऊनही अंतिम क्षणी तो बाहेर झाला होता. आता प्रदीर्घ विश्रांतीनंतर कोहली नव्या जोशात इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com