Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

Lizlaz Heize Virat Kohli news: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने मैदानात धावांचा पाऊस पाडत आहे.
Virat Kohli Lizlaz Controversy
Virat Kohli Lizlaz ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने मैदानात धावांचा पाऊस पाडत आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानाबाहेरही विराटची चर्चा कमी नाही. काही दिवसांपूर्वी विराटने एका जर्मन मॉडेलची पोस्ट 'लाईक' केल्याने सोशल मीडियावर मोठे वादळ उठले होते. आता याच प्रकरणावर संबंधित मॉडेल लिजलैज हिने धक्कादायक खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे.

विराटच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा कट?

एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना लिजलैजने सांगितले की, जेव्हा विराटने तिची इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केली, तेव्हापासून तिला अनेक माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकारांचे फोन येऊ लागले. धक्कादायक बाब म्हणजे, काही पत्रकारांनी तिला चक्क पैशांचे आमिष दाखवले होते. विराट कोहलीविरुद्ध चुकीची विधाने करावीत आणि त्याची प्रतिमा मलीन करावी, यासाठी तिला पैसे ऑफर करण्यात आले होते, असा दावा तिने केला आहे.

Virat Kohli Lizlaz Controversy
Goa Case: दिनेश गावडेंच्‍या शवचिकित्सा पोस्टमॉर्टमवरून उफाळला वाद; प्रकरण तापले : वन खाते-फॉरेन्सिक विभाग आमनेसामने

पैशांसाठी नीतिमत्ता सोडण्यास नकार

या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकताना लिजलैज म्हणाली, "काही पत्रकारांनी मला अशा गोष्टी सांगण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली होती, ज्या कधी घडल्याच नव्हत्या. पण मी असे का करू? केवळ पैशांसाठी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब करणे मला पटणारे नाही. मी अशा स्वभावाची नाही." लिजलैजच्या या खुलाशानंतर विराटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून, विराटला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची टीका केली जात आहे.

Virat Kohli Lizlaz Controversy
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोण आहे ही जर्मन मॉडेल?

लिजलैज ही मुळची जर्मन-दक्षिण आफ्रिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आहे. ती एक उत्तम गायिका असून ट्रॅव्हल व्लॉग्ससाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे लिजलैज भारतीय संस्कृतीची मोठी चाहती आहे. तिने भारताचे अनेक दौरे केले असून हरियाणातील एका लग्नात सहभागी झाल्याचे तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. साधारण तीन आठवड्यांपूर्वी विराटने तिची एक पोस्ट लाईक केली होती, ज्यावरून मोठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com