Vaibhav Suryavanshi: मैदानावरच्या 'किंग'ची बोर्डाच्या परीक्षेला 'दांडी'! वैभव सूर्यवंशी दहावीची परीक्षा देणार नाही! समोर आलं 'हे' कारण

Vaibhav Suryavanshi 10th board exams: बिहारच्या मातीतून उदयाला आलेला आणि क्रिकेट विश्वात आपल्या बॅटने खळबळ माजवणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे.
Vaibhav Suryavanshi 10th board exams
Vaibhav Suryavanshi 10th board examsDainik Gomantak
Published on
Updated on

बिहारच्या मातीतून उदयाला आलेला आणि क्रिकेट विश्वात आपल्या बॅटने खळबळ माजवणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण त्याचे शतक नसून त्याचे शिक्षण आहे. समस्तीपुरचा हा 'वंडर किड' यंदाची सीबीएसई (CBSE) बोर्डाची दहावीची परीक्षा देणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या वैभवने सध्या केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेला दांडी

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सूर्यवंशी हा ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे. १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी त्याचे अधिकृत प्रवेशपत्र (Admit Card) देखील जारी करण्यात आले होते. शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. वैभवची लोकप्रियता पाहता, परीक्षा केंद्रावर गर्दी हाताळण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्याची तयारीही प्रशासनाने केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी वैभवने यंदा परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला आहे.

Vaibhav Suryavanshi 10th board exams
Goa: 'सर्वधर्म समभावाच्‍या वृत्तीनेच गोमंतकीय जगतात'! मुख्‍यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; राज्‍यात टॅक्‍सी माफिया नसल्याचा केला दावा

क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी वैभवच्या या निर्णयाला दुजोरा दिला आहे. क्रिकेटच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे वैभवला अभ्यासासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. पुढच्या महिन्यापासून आयपीएलचा (IPL) नवा हंगाम सुरू होत आहे आणि वैभव त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज होत आहे. सध्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपली जागा टिकवून ठेवणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे हीच त्याची प्राथमिकता असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

Vaibhav Suryavanshi 10th board exams
Goa Street Race: 'पुढील 3 वर्षे गोवा स्ट्रीट रेस होत राहील'! CM सावंतांचे प्रतिपादन; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

वैभव सूर्यवंशीची वाढती प्रसिद्धी पाहता, बिहार क्रिकेट असोसिएशनने (BCA) त्याच्या शिक्षणाबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. बीसीएचे माजी अध्यक्ष राकेश तिवारी यांनी सांगितले की, वैभव जिथे जातो तिथे हजारो चाहत्यांची गर्दी जमते. अशा परिस्थितीत तो सध्या देशातील सर्वात लाडका तरुण क्रिकेटर बनला आहे. त्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी असोसिएशन भविष्यात काही पर्यायी व्यवस्थेचा विचार करत आहे, जेणेकरून तो क्रिकेटच्या व्यापातून वेळ काढून नंतर आपली परीक्षा पूर्ण करू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com