

आयपीएल २०२६ मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने ‘ऑरेंज कॅप’ पटकावणारा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय आहे. मात्र, आता वैभवच्या कामगिरीपेक्षाही त्याच्या १० वर्षांच्या धाकट्या भावाच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका सराव सामन्यात, क्रिकेट अकादमी ताजपूरचे प्रतिनिधित्व करताना आशीर्वादने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. या सामन्यात आशीर्वादने केवळ ८७ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे, त्याने आपल्या शतकी खेळीत २० चौके आणि १ उत्तुंग षटकार लगावला. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२० राहिला, जो त्याच्या वयाचा विचार करता अत्यंत प्रभावी मानला जात आहे. आशीर्वादच्या या कामगिरीबद्दल त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त केला आहे.
मोठा भाऊ वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये १६ सामन्यांत ७७६ धावा करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या काळात त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तसेच, आगामी एशियन गेम्स २०२६ साठीही त्याची निवड झाली आहे. सध्या वैभव श्रीलंका येथे ‘ट्राय सिरीज’मध्ये भारतीय ‘अ’ संघाकडून खेळत आहे.
एकाच कुटुंबातील दोन मुलांची अशी कामगिरी क्रिकेट प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. वैभवने ज्या पद्धतीने कठीण प्रसंगात स्वतःला सिद्ध केले आहे, तशाच पाऊलखुणा आता १० वर्षांचा आशीर्वाद उमटवत आहे. आगामी काळात ही दोन्ही भावंडे भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर चमकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.