VIDEO: ज्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस केला, ते आज पूर्ण झालं! वैभव सूर्यवंशीचा थेट काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

Vaibhav Sooryavanshi Emotional Video: आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेआधी जेव्हा पहिल्यांदाच वैभवच्या हातात टीम इंडियाची जर्सी सोपवण्यात आली.
Vaibhav Sooryavanshi Emotional Video
Vaibhav SooryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Emotional Video: प्रत्येक तरुण क्रिकेटपटूचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी टीम इंडियाची निळी जर्सी परिधान करणे. बिहारच्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले. आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेआधी जेव्हा पहिल्यांदाच वैभवच्या हातात टीम इंडियाची जर्सी सोपवण्यात आली, तेव्हा या युवा फलंदाजाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

बीसीसीआयने मंगळवारी (23 जून) या खास क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये वैभव पहिल्यांदाच भारताची (India) अधिकृत जर्सी परिधान करताना दिसत असून, हा क्षण त्याच्यासाठी इतका भावनिक होता की काही काळासाठी त्याला आपले शब्दच सुचेनासे झाले आणि डोळे पाणावले.

Vaibhav Sooryavanshi Emotional Video
Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

टीम इंडियाची जर्सी मिळाल्याबद्दल आपली भावना व्यक्त करताना वैभव म्हणाला की, हा आनंद शब्दांत मांडणे अशक्य आहे. ज्या ध्येयाने त्याने लहानपणी पहिल्यांदा हातात बॅट धरली आणि क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले, ते त्याचे बालपणापासूनचे स्वप्न आज पूर्ण झाले. त्या खडतर प्रवासातील सर्वात मोठे पाऊल आज पडले असून हा सगळा प्रकार त्याला एखाद्या स्वप्नासारखा वाटत आहे. जर्सी पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले. कधीकधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो आणि जेव्हा त्या प्रत्यक्षात येतात, तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही; अगदी तसाच अनुभव सध्या येत असल्याचे त्याने सांगितले.

Vaibhav Sooryavanshi Emotional Video
Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

या व्हिडिओमध्ये एक अतिशय सुंदर आणि संस्कार जपणारा क्षणही कॅप्चर झाला. जेव्हा टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशलिस्ट रघु हा जर्सीचा बॉक्स घेऊन हॉटेलच्या रुममध्ये पोहोचला, तेव्हा दरवाजा उघडताच वैभवने सर्वात आधी रघुच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अत्यंत आदराने जर्सीचा बॉक्स उघडून, भारताची ती प्रतिष्ठित जर्सी हातात घेऊन तो काही वेळ तिच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांत स्वप्न पूर्ण झाल्याची चमक स्पष्ट दिसत होती.

Vaibhav Sooryavanshi Emotional Video
Team India Semi Final Scenario: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वेस्ट इंडिजचा विजय भारतासाठी धोक्याची घंटा? सेमीफायनलचं समीकरण आता 'करो या मरो'!

वैभव सातत्याने आपल्या धाकड कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो आयपीएल इतिहासातील शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या हंगामात तब्बल 71 षटकारांच्या मदतीने 776 धावा कुटल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले. या विस्मयकारक कामगिरीच्या जोरावरच त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत या 15 वर्षांच्या स्टार फलंदाजाच्या कामगिरीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे डोळे लागून राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com