पणजी ः मडगावच्या तेजस शेवडे याने पाचव्यांदा गद्रे गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला. अंतिम लढतीत त्याने गतविजेत्या कर्नाटकच्या प्रणीत वेणुगोपाळ याच्यावर 6-2, 7-6 (2) फरकाने मात केली.
मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस संकुलात झालेल्या स्पर्धेत महिला एकेरीत कोल्हापूरच्या 12 वर्षीय रितिका डावलकर हिने विजेतेपद (Winner) प्राप्त केले. अंतिम लढतीत तिने गोव्याच्या ऑलिव्हिया चौगुले हिच्यावर 6-1, 6-3 असा विजय नोंदविला.
पुरुष एकेरीत गतवर्षीच्या अंतिम लढतीत प्रणीतविरुद्ध खेळताना स्नायू दुखावल्यामुळे तेजसला माघार घ्यावी लागली होती व त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बंगळूरविरुद्धच्या (Bangalore) प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तेजसने यावेळेस जोमदार खेळ करत विजेतेपद निसटू दिले नाही. पहिला सेट त्याने दोन गेमच्या मोबदल्यात जिंकला, मात्र दुसरा सेट कमालीचा रंगला. प्रणीतने आठ बिनतोड सर्व्ह केल्या. तेजसने नेटजवळील खेळावर भर दिला. दुसऱ्या सेटमध्ये 6-6 बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये तेजसने आघाडी घेतली आणि विजेतेपदही निश्चित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.