Team India: बांगलादेशविरुद्ध कसोटी तर जिंकली, पण टीम इंडियासमोर उभे राहिलेत 'हे' यक्षप्रश्न

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघाला काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.
Team India
Team India Dainik Gomantak
Published on
Updated on

Team India: भारतीय संघाने नुकताच बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा विजयही मिळवला. असे असले तरी भारतीय संघाने या मालिकेदरम्यान झालेल्या अनेक चूकांवर काम करावे लागणार आहे.

भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणेही भारताला कठीण गेले होते. भारताकडून आर अश्विन आणि श्रेयस अय्यरने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे अखेर भारताने हा सामना जिंकला होता.

मात्र, या मालिकेत भारताकडून अनेक चूका झाल्या, ज्यावर भारतीय संघाला काम करावे लागणार आहे.

Team India
Cricket Australia: भारीच ना! शेन वॉर्नच्या नावाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया देणार 'हा' मानाचा पुरस्कार

आक्रमक खेळ करण्यात अपयशी

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार केएल राहुलने आक्रमक खेळ करण्याबद्दल भाष्य केले होते. मात्र, या मालिकेत भारताकडून आक्रमक क्रिकेट खेळण्यात अपयश आल्याचे स्पष्ट दिसले.

दुसऱ्या कसोटीत 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक खेळ करण्याची अपेक्षा होती. जरी खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक नसली, तरी 145 धावांचे माफक आव्हान होते. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाज अतिशय बचावात्मक पवित्रा स्विकारताना दिसले. त्यामुळे फिरकीपटूंना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली.

Team India
Boxing Day Test नक्की आहे तरी काय अन् टीम इंडियाचा याच्याशी कसा संबंध?

फिरकीपटूंच्या विरुद्ध संघर्ष

भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात, असे म्हटले जायचे. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्धच संघर्ष करताना दिसत आहेत. फिरकी गोलंदाजी ही सध्याच्या पिढीची कमजोरी झाल्याचे दिसत आहे.

बांगलादेशविरुद्धही भारतीय फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकताना दिसले. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Team India
IND vs SL: हार्दिक पंड्याच होणार टीम इंडियाचा कर्णधार! 'हा' व्हिडिओ पाहून बसेल विश्वास

सातत्याने संघात बदल

दरम्यान, भारताच्या संघात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. ज्यामुळे खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण होण्यात अडचण होण्याची शक्यता वाढते. पहिल्या सामन्यात 8 विकेट्स घेऊन सामनावीर ठरलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत खेळवण्यात आले नव्हते.

तसेच अनेक खेळाडूही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळेही संघात बदल करावा लागत आहे. पण अशा गोष्टीमुळे खेळाडूंमध्ये संघात टिकून राहण्यासाठी दबाव निर्माण होऊन त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

Team India
Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

केएल राहुलचा खराब फॉर्म

बांगलादेश दौऱ्यात कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या केएल राहुलचा फॉर्मही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तो यावर्षी 30 सामन्यांत केवळ 25.68 च्या सरासरीने 822 धावा करू शकला आहे. यात त्याच्या 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला 4 डावात मिळून 60 धावाही करता आल्या नव्हत्या. त्यामुळे आता केएल राहुलला त्याचा फॉर्म परत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा त्याला लवकरच भारतीय संघातील जागा गमवावी लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com