Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान भारतीय संघाला 6 मालिका खेळायच्या आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India: भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगलीच व्यस्त राहाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे जानेवारी ते मार्च दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ भारताचा दौरा करणार आहेत. त्यामुळे जानेवारीपासून भारतीय संघाचा मायदेशातील क्रिकेटचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान भारतीय संघाला मायदेशात एकूण 6 मालिका आणि 19 सामने खेळायचे आहेत.

दरम्यान, भारतात 2023 साली वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यादृष्टीने आगामी मालिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

(India's schedule for home series against Sri Lanka, New Zealand and Australia)

Team India
Team India मध्ये संधी मिळालेल्या पाटीदारची कामगिरी राहिलीये धमाकेदार, पाहा आकडेवारी

श्रीलंकेचा भारत दौरा 2023

भारतीय संघाचा मायदेशातील हंगाम श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेने सुरू होईल. श्रीलंका संघ 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी जानेवारीच्या सुरुवातीलाच भारतात येणार आहे. श्रीलंकेचा हा भारत दौरा 3 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान रंगेल.

भारत विरुद्ध श्रीलंका वेळापत्रक -

आंतरराष्ट्रीय टी20 मालिका

3 जानेवारी - पहिला टी20 सामना, मुंबई

5 जानेवारी - दुसरा टी20 सामना, पुणे

7 जानेवारी - तिसरा टी20 सामना, राजकोट

वनडे मालिका

10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी

12 जानेवारी - दुसरा वनडे, कोलकाता

15 जानेवारी - तिसरा वनडे, तिरुअनंतपुरम

Team India
Team India: चुकीला माफी नाही! पराभवानंतर आता ICC ची टीम इंडियावर कारवाई

न्यूझीलंडचा भारत दौरा 2023

श्रीलंकेच्या संघानंतर जानेवारीच्या मध्यात न्यूझीलंड संघ भारतात येईल. न्यूझीलंड देखील भारताविरुद्ध 3 वनडे सामन्यांची आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळतील. दरम्यान, 21 जानेवारी रोजी होणारा दुसरा वनडे सामना रायपूरला होईल. हा रायपूरमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरेल. न्यूझीलंडचा हा दौरा 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक

वनडे मालिका

18 जानेवारी - पहिला वनडे, हैदराबाद

21 जानेवारी - दुसरा वनडे, रायपूर

24 जानेवारी - तिसरा वनडे, इंदोर

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

27 जानेवारी - पहिला टी20 सामना, रांची

29 जानेवारी - दुसरा टी20 सामना, लखनऊ

1 फेब्रुवारी - तिसरा टी20 सामना, अहमदाबाद

Team India
Team India: पाकिस्तानचा पराभव होताच भारताला झाला मोठा फायदा, कसा ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023

न्यूझीलंडनंतर लगेचच फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाचा संघ दीड महिन्याच्या भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी-मार्च दरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. ऑस्ट्रेलियाचा हा भारत दौरा 9 फेब्रुवारीपासून सुरु होईल आणि 22 मार्च रोजी संपेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

वनडे मालिका

17 मार्च - पहिला वनडे, मुंबई

19 मार्च - दुसरा वनडे, विशाखापट्टणम

22 मार्च - तिसरा वनडे, चेन्नई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com