T20 World Cup 2026: उपांत्य फेरीचं स्वप्न धूसर; आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा मोठा 'फ्लॉप शो', पराभवाची 5 मुख्य कारणं!
भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० विश्वचषक २०२६ मधील विजयाचा धडाका अखेर दक्षिण आफ्रिकेने मोडून काढला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ सुपर-८ च्या पहिल्याच महत्त्वाच्या सामन्यात पत्त्यासारखा कोसळला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी मोठा पराभव केला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात धावसंख्येचा हा फरक खूप मोठा मानला जातो, ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सलामीवीर ठरले फ्लॉप; इशान किशन आणि अभिषेकची निराशा
१८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला एका वादळी सुरुवातीची गरज होती. मात्र, पहिल्याच षटकात इशान किशन शून्यावर बाद झाल्याने भारतीय डावाला गळती लागली. विशेष म्हणजे, मागील सामन्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अभिषेक शर्माच्या जागी इशानने स्ट्राइक घेतली, पण त्याला चार चेंडूंत खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे, अभिषेक शर्माला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती, मात्र १५ धावांवर त्याने आपली विकेट बहाल केली. मागील तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या अभिषेकने या सुवर्णसंधीचा फायदा न उठवल्याने तो टीकेचा धनी ठरत आहे.
मधली फळीही पत्त्यासारखी कोसळली
इशान आणि अभिषेक लवकर बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिलक वर्मावर होत्या. मात्र, या महत्त्वाच्या क्षणी तिलक जबाबदारी स्वीकारण्यात अपयशी ठरला. केवळ एक धाव करून तो माघारी परतल्याने टीम इंडिया पूर्णपणे दबावाखाली आली. सुरुवातीचे तीन गडी झटपट बाद झाल्याचा परिणाम असा झाला की, सूर्यकुमार यादव आणि इतर फलंदाजांना डाव सावरता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या १८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा डाव स्वस्त्यात आटोपला.
पराभवाचे मुख्य गुन्हेगार कोण?
या मोठ्या पराभवासाठी संपूर्ण संघ जबाबदार असला तरी, सलामी जोडीचे सातत्यपूर्ण अपयश हा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे. अभिषेक शर्माची धावा करत नाहीय, तर तिलक वर्मा मिळालेल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकलेला नाही.
सुपर-८ मधील या पहिल्याच पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग आता खडतर झाला असून, पुढील सामन्यांमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

