T20 World Cup 2022: Super-12 चे सर्व संघ झाले फायनल, हे 2 संघ टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये

Indian Team For T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे.
Captains
CaptainsDainik Gomantak
Published on
Updated on

Super-12 All Team For T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. जिथे वेस्ट इंडिजसारखा संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला आहे. तर आयर्लंड सुपर-12 साठी पात्र ठरला आहे. यातच आता T20 विश्वचषक 2022 चे पात्रता सामने संपले आहेत. पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-12 च्या सर्व संघांबद्दल जाणून घेऊया...

या चार संघांनी स्थान मिळवले

सुपर-12 मध्ये आधीच 8 संघ होते. यामध्ये भारत (India), पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या बलाढ्य संघांचा समावेश आहे. आता पात्रता फेरीतून श्रीलंका (Sri Lanka), नेदरलँड, झिम्बाब्वे आणि आयर्लंड सुपर-12 साठी पात्र ठरले आहेत.

Captains
T20 World CUP 2022: श्रीलंका नाही तर 'या' संघाचा भारताच्या ग्रुपमध्ये प्रवेश; 27 ऑक्टोबरला लढत

या दोन संघांनी भारताच्या गटात प्रवेश केला

झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने पात्रता फेरीतून सुपर-12 च्या गट-2 मध्ये स्थान मिळवले आहे. ग्रुप-2 मध्ये भारतीय संघ 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी 6 नोव्हेंबरला टीम इंडियाचा (Team India) सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. त्याचवेळी, टीम इंडियाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यासाठी सर्व क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत.

प्रबळ दावेदार

टीम इंडिया टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये एकमेव विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून टीम इंडिया या ट्रॉफीपासून दूर आहे. पण यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास घडवू शकते. भारताकडे असे अनेक स्टार खेळाडू आहेत, जे त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकतात.

Captains
T20 World Cup 2022: भारत-ऑस्ट्रेलियासह 'हे' संघ आज भिडणार

सुपर-12 सर्व संघ

गट 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ विजेता (श्रीलंका), गट ब उपविजेता (स्कॉटलंड)

गट 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, गट अ उपविजेता (नेदरलँड), गट ब विजेता (झिम्बाब्वे)

Captains
T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कट्टर शत्रू पाकिस्तान संघात परतला!

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताविरुद्ध (भारतीय वेळ):

भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न

भारत विरुद्ध नेदरलँड्स, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता, सिडनी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30, पर्थ

भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता, अ‍ॅडलेड

भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 6 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com