T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कट्टर शत्रू पाकिस्तान संघात परतला!

Pakistan Team: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत आहे.
Pakistan cricket team
Pakistan cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan For T20 World Cup 2022: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत आहे. न्यूझीलंडला हरवून पाकिस्तानने तिरंगी मालिका जिंकली आहे. आता टी-20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. उस्मान कादिरच्या जागी एका धडाकेबाज फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल.

हे खेळाडू पाकिस्तान संघात सामील झाले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी स्टार फलंदाज फखर जमानचा (Fakhr Zaman) टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात समावेश केल्याचे जाहीर केले. पीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "25 सप्टेंबर रोजी कादिरला कराची येथे इंग्लंड (England) विरुद्धच्या T20 सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे हा बदल आवश्यक होता."

Pakistan cricket team
T20 World Cup 2022: काही कळलचं नाही! टीम इंडियाचा अचानक बदलला कर्णधार

लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार

पहिला राखीव खेळाडू म्हणून यादीत समाविष्ट असलेला फखर जमान शनिवारी लंडनहून ब्रिस्बेनला पोहोचेल, त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही असणार आहे. ही जोडी पाकिस्तानच्या (Pakistan) इंग्लंड (17 ऑक्टोबर) आणि अफगाणिस्तान (19 ऑक्टोबर) विरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध असतील.

Pakistan cricket team
T20 World Cup 2022: कोरोनाला हरवून मोहम्मद शमी मैदानात परतला, पाहा सरावाचा व्हिडिओ

भारताविरुद्ध परफॉर्मन्स चांगला

फखर जमानची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फखर जमाननेच टीम इंडियाविरुध्द शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारताचे विजेतेपदाचे स्वप्नही भंगले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने 114 धावा केल्या होत्या. फायनलमध्ये टीम इंडियाला 180 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com