T20 World Cup 2022: भारत-ऑस्ट्रेलियासह 'हे' संघ आज भिडणार

IND vs AUS: T20 विश्वचषक 2022 मध्ये आज चार सराव सामने खेळवले जातील.
T20 World Cup: BCCI allow fans in stadium
T20 World Cup: BCCI allow fans in stadium Dainik Gomantak
Published on
Updated on

टि20 (T20) विश्वचषक 2022 सुरू झाला आहे. फस्ट राउंडचे सामने खेळवले जात आहेत. या फेरीत आठ संघ स्पर्धा करत आहेत. येथून चार संघ सुपर-12 फेरीत पोहोचतील. येथे, सुपर-12 मध्ये आधीच उपस्थित असलेल्या 8 संघांनी त्यांच्या विश्वचषकाच्या तयारीला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. हे 8 संघ आज सराव सामन्यात भिडणार आहेत. आज एकूण चार सराव सामने खेळवले जातील, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामन्यासह इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावर असतील.

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

आज ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी टॉस होईल. भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची T20I मालिका घरच्या मैदानात 2-1 अशी जिंकली, जरी यावेळी सामना ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर आहे. अशा स्थितीत वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघ गतविजेत्याचा कसा सामना करतो हे पाहणे रंजक ठरेल.

  • न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

हा सामना ब्रिस्बेनमधील अॅलन बॉर्डर फील्डवर खेळवला जाईल. हा सामनाही आज सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. न्यूझीलंडने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची तिरंगी मालिका गमावली. दुसरीकडे, भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव झाला. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी दोन्ही संघ विजयी लयीत परतण्याचा प्रयत्न करतील.

T20 World Cup: BCCI allow fans in stadium
ISL Football: केरळा ब्लास्टर्सवरील विजयात पेत्रातोसची हॅटट्रिक
  • इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

हा सामना आज दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. हा सामना ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडवरच होणार आहे. गेल्या महिन्यात इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची 7 सामन्यांची टी-20 मालिका 4-3 अशी जिंकली होती. याच भूमीवर इंग्लंडने नुकतीच टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जिथे इंग्लिश संघ आपली विजयी गती कायम राखण्यासाठी जाईल. त्याच वेळी, पाकिस्तान संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारतासोबतच्या लढतीसाठी आपल्या प्लेइंग-11 ची चाचणी घेईल.

  • अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश

हे दोन संघ ब्रिस्बेनमधील अॅलन बॉर्डर मैदानावर दुपारी 1.30 वाजता आमनेसामने येतील. बांगलादेशचा संघ सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या T20 विश्वचषकापासून त्याला जेमतेम काही विजय मिळाले आहेत. २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वी कर्णधार शकीबला आपल्या संघाला विजयाची चव चाखायला आवडेल. दुसरीकडे, अफगाणिस्तान आशिया कप 2022 मध्ये संमिश्र कामगिरीसह पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. हे सर्व सामने Star Sports Network आणि Disney + Hotstar अॅपच्या विविध चॅनेलवर पाहता येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com