T20 World CUP 2022: टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरितील ग्रुप ए मधील सामन्यात युएईने नामिबियावर सात धावांनी मात केली. नामिबियाच्या पराभवाने नेदरलँड संघाचा सुपर-12 गटात प्रवेश झाला आहे. नेदरलँड भारताच्या ग्रुपमध्ये आला आहे. त्यामुळे आथा २७ ऑक्टोबर रोजी भारत आणि नेदरलँड अशी लढत होईल.
दरम्यान, ग्रुप ए मधील श्रीलंका संघानेही सुपर-12 गटात प्रवेश मिळवला आहे. संयुक्त अरब अमिरातीचा संघ स्पर्धेतून याआधीच बाहेर पडला आहे. नेदरलँडने पात्रता फेरीतील ग्रुप ए मधील लढतीत श्रीलंकेनंतर दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे नेदरलँडचा समावेश सुपर-12 च्या ग्रुप-२मध्ये झाला. त्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, साउथ अफ्रीका, बांग्लादेश हे संघ आहेत.
श्रीलंका पात्रता फेरीत गटात अव्वल राहिल्याने सुपर-12 मध्ये ग्रुप-1 मध्ये श्रीलंकेचा समावेश झाला आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत. ग्रुप १ मध्येही आणखी एक संघ येईल. सुपर-12 च्या दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी एका संघाचा समावेश होणार आहे. त्याचा निर्णय 21 ऑक्टोबर रोजी होईल.
पात्रता फेरी
ग्रुप A: श्रीलंका, यूएई, नेदरलँड, नामिबिया
ग्रुप B: आयर्लंड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्टइंडीज
सुपर-12
ग्रुप 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगानिस्तान, ग्रुप-A विनर (श्रीलंका), ग्रुप-B रनर-अप
ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रीका, बांग्लादेश, ग्रुप-A रनर-अप (नेदरलँड), ग्रुप-B विनर
भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी
वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये होणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरोधात, 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफिकेविरोधात, 2 नोव्हेंबरला बांग्लादेशसोबत तर 6 नोव्हेंबर रोजी ग्रुप बी च्या विजेत्याशी भारताची लढत होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.