टीम इंडियाचा 'मिस्टर 360' आता मुंबईचा कर्णधार! सूर्यकुमार यादव दीर्घ काळानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मैदानात उतरणार

Suryakumar Yadav Mumbai Captain: देशाला टी-२० विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातून बाहेर करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादवची या आठवड्यात सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक राष्ट्रीय टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Suryakumar Yadav Mumbai Captain
Suryakumar Yadav Mumbai CaptainDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मुंबई: देशाला टी-२० विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातून बाहेर करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादवची या आठवड्यात सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक राष्ट्रीय टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेद्वारे सूर्यकुमार प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार आहे. सूर्यकुमार यादवला रणजी सामन्यांतही खेळायचे होते. तशी इच्छा त्याने व्यक्त केली होती, परंतु मुंबई संघाच्या सराव शिबिरात आणि सराव सामन्यात समावेश नसल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. आता टी-२० प्रकारासाठी मात्र त्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

मुंबईचा क्रिकेट इतिहास सर्वांत मोठा आहे आणि विजयांचीही परंपरा आहे. अशा संघाचे आणि त्यातील गुणवान नवोदित खेळाडूंचे कर्णधारपद सांभाळणे हा माझ्यासाठी मोठा अभिमान आहे, अशी भावना सूर्यकुमार यादवने व्यक्त केली.

Suryakumar Yadav Mumbai Captain
Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

राष्ट्रीय विजेतेपदाचा हा करंडक पुन्हा मुंबईकडे आणणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी सर्वस्व बहाल करून आम्ही खेळू, असा विश्वास सूर्यकुमारने व्यक्त केला.

मुंबईचा टी-२० संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सर्फराझ खान, साईराज पाटील, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलाणी, मॅक्सवेल स्वामीनाथन, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसोझा आणि हार्दिक तामोरे.

Suryakumar Yadav Mumbai Captain
Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

शार्दुलचेही पुनरागमन

पायाच्या दुखापतीमुळे शार्दुल ठाकूर रणजी करंडक स्पर्धेतील अगोदरच्या चारही साखळी सामन्यात खेळला नाही. आता तो पूर्ण तंदुरुस्त असून, त्याचेही मुंबईच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.