T20 World Cup 2026: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! टी-20 विश्वचषकात कांगारूंच्या ताफ्यात 'या' वादळाची अचानक एन्ट्री

Steve Smith replaces Josh Hazlewood in Australia squad ahead: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात मोठ बदल पाहायला मिळत आहे.
T20 World Cup 2026
T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात मोठ बदल पाहायला मिळत आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जॅाश हेझलवूडच्या जागी अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हा बदल करण्यात आल्यानं ऑस्ट्रेलियन गोटात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

स्मिथची एन्ट्री

जॅाश हेझलवूडला पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते आणि तो स्पर्धेच्या उत्तरार्धात पुनरागमन करेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती. मात्र, दुखापत गंभीर असल्यानं तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. त्याच्या जागी आता स्टीव्ह स्मिथच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत वाटत होती, अशा वेळी स्मिथच्या अनुभवामुळे संघाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2026
Goa Accident: 'तो' चालक होता दारूच्या नशेत! पत्रकार कार्व्हालो मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद; संशयिताची जामिनावर सुटका

बीबीएलमधील वादळी कामगिरीचे फळ

स्टीव्ह स्मिथला टी-२० संघात स्थान मिळावे की नाही, याबाबत क्रिकेट वर्तुळात अनेकदा चर्चा होते. मात्र, बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६ च्या हंगामात त्यानं आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

सिडनी सिक्सर्सकडून खेळताना त्याने ६ सामन्यांत ५९.८० च्या सरासरीने आणि १६७.९७ च्या स्ट्राइक रेटने २९९ धावा कुटल्या. यामध्ये त्याने केवळ ४१ चेंडूत झळकावलेल्या एका धडाकेबाज शतकाचाही समावेश आहे, जे बीबीएल इतिहासातील संयुक्त दुसरे वेगवान शतक ठरले आहे.

T20 World Cup 2026
Goa Politics: 'काँग्रेसने आळस झटकून कामाला लागावे'! सरदेसाईंचा सल्ला; कार्निव्हलमध्ये दिली विजयाची खात्री

दोन वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

स्मिथने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. कर्णधार मिचेल मार्शच्या दुखापतीमुळे स्मिथ आधीच 'कव्हर' म्हणून संघात होता, पण आता हेझलवूडच्या जागी त्याला मुख्य संघात अधिकृत स्थान मिळाले आहे. ६७ टी-२० सामन्यांचा अनुभव असलेला स्मिथ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com