VIDEO: जबरदस्त स्टेप्स, किलर एक्सप्रेशन! क्रिकेटपटू श्रेयंका पाटीलची अभिनेत्रींना टक्कर; 'बबली बदमाश' गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडिओ

Shreyanka Patil Dance Video: भारतीय महिला क्रिकेट संघातील युवा आणि प्रतिभावान खेळाडू श्रेयंका पाटील सध्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे.
Shreyanka Patil Dance Video
Shreyanka Patil Dance VideoDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघातील युवा आणि प्रतिभावान खेळाडू श्रेयंका पाटील सध्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे. क्रिकेटपासून काही काळ दूर असतानाही श्रेयंका सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय आहे. मैदानावरील तिच्या कामगिरीसोबतच तिचा डान्सचा अंदाजही चाहत्यांना आवडतो. आता श्रेयंका पाटीलचा असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘बबली बदमाश’ गाण्यावर श्रेयंका थिरकली

श्रेयंका पाटीलने प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट ‘शूटआउट अॅट वडाला’मधील ‘बबली बदमाश’ या गाण्यावर डान्स करत रील तयार केली आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची मैत्रीण इंचारा सी यू देखील दिसत आहे. दोघींनी गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स मूव्ह्स सादर केले असून, श्रेयंका पाटीलचा आत्मविश्वास आणि एनर्जी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी श्रेयंकाच्या डान्सचे कौतुक केले आहे. तिच्या क्रिकेटमधील आक्रमक शैलीप्रमाणेच डान्समधील तिचा उत्साहही चाहत्यांना पसंत पडत आहे.

Shreyanka Patil Dance Video
Goa Film City Demand: "गोव्यात फिल्म सिटी उभारा!", ESG सदस्य शर्मद पै रायतुरकर यांची मागणी

क्रिकेटसोबत डान्सचीही आवड

श्रेयंका पाटीलला क्रिकेटव्यतिरिक्त डान्सचीही विशेष आवड असल्याचे तिने यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ आणि रील्स शेअर करताना दिसते. तिच्या या पोस्टना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

या व्हिडीओमध्ये दिसणारी इंचारा सी यू हीदेखील क्रिकेटपटू आहे. अवघ्या 17 वर्षांची इंचारा कर्नाटककडून क्रिकेट खेळते. क्रिकेटच्या मैदानाबाहेर दोन्ही मैत्रिणींची ही मजेशीर केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

काही चाहत्यांनी दिला क्रिकेटवर लक्ष देण्याचा सल्ला

श्रेयंका पाटीलच्या डान्स व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असली तरी काही सोशल मीडिया युजर्सनी तिला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे श्रेयंकाच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ती पूर्णपणे फिट होऊन पुन्हा मैदानात कधी परतेल, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

श्रेयंका पाटीलने 2023 मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र दुखापतींमुळे तिला अनेकदा संघाबाहेर राहावे लागले. आतापर्यंत तिने भारतासाठी 3 वनडे सामने खेळले असून, तिच्या नावावर 5 विकेट्स आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने 24 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या आहेत.

Shreyanka Patil Dance Video
Goa Politics: सावर्डे मतदारसंघात मी पुन्हा येईन! भाजपच्या उमेदवारीवरून विनय तेंडुलकरांची घोषणा

RCBसाठीही ठरली महत्त्वाची खेळाडू

महिला प्रीमियर लीगमध्ये श्रेयंका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे. RCBकडून खेळताना तिने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली असून 24 सामन्यांत 30 विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरी फिरकी गोलंदाज असण्यासोबतच ती खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजीही करू शकते.

महिला टी-20 विश्वचषकातही श्रेयंकाला दुखापतीचा फटका बसला होता. तिला स्पर्धेत केवळ दोन सामने खेळता आले. आता दुखापतीतून पूर्णपणे सावरून ती मैदानावर दमदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना आहे. दरम्यान, क्रिकेटपासून दूर असताना केलेल्या ‘बबली बदमाश’वरील डान्स रीलमुळे श्रेयंका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com