Goa Politics: सावर्डे मतदारसंघात मी पुन्हा येईन! भाजपच्या उमेदवारीवरून विनय तेंडुलकरांची घोषणा

Vinay Tendulkar Sawordem: ‘सावर्डेत मी पुन्हा येईन’, अशी अर्थपूर्ण घोषणा बुधवारी माजी मंत्री आणि राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी सावर्डे जिमखाना आणि शारदा इंग्लिश हायस्कूल या संस्थांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केली.
Vinay Tendulkar Sawordem
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

सावर्डे: सावर्डे मतदारसंघात भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय चर्चा सुरू असताना ‘सावर्डेत मी पुन्हा येईन’, अशी अर्थपूर्ण घोषणा बुधवारी माजी मंत्री आणि राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी सावर्डे जिमखाना आणि शारदा इंग्लिश हायस्कूल या संस्थांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केली.

यावेळी व्यासपीठावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई तसेच सावर्डेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच संजय नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सावर्डेचे लोक मला पुन्हा येण्याचे आवाहन करत आहेत. त्यांना मी हवा आहे, त्यामुळे यावेळी निश्चितच मी पुन्हा येईन, असे तेंडुलकर म्हणाले.

Vinay Tendulkar Sawordem
Goa Film City Demand: "गोव्यात फिल्म सिटी उभारा!", ESG सदस्य शर्मद पै रायतुरकर यांची मागणी

संकेत आर्सेकरही इच्छुक!

सावर्डे मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार गणेश गावकर असले तरी विनय तेंडुलकर आणि संकेत आर्सेकर या दोघांनीही निवडणूक लढविण्याची आपली इच्छा बोलून दाखविली होती.

संकेत आर्सेकर यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आता माघार नाही’, अशी घोषणा केली होती. त्याच धर्तीवर बुधवारी तेंडुलकर यांनी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केल्याने ही एक सूचक अशी बाब मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com