Rohit Sharma: WTC फायनलमध्ये पराभूत होताच रोहितच्या नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा 'रेकॉर्ड'

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

WTC फायनल जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला 444 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ केवळ 234 धावाच करु शकला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

रोहितच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली. त्याचवेळी, रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप 2018 आणि निदाहस ट्रॉफी 2018 चे विजेतेपद पटकावले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये हरल्याबरोबर, रोहितच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्या नेतृत्वाखाली फायनल सामना हरला.

Rohit Sharma
WTC 2023 Final: भारताचं स्वप्न पुन्हा भंगलं! ऑस्ट्रेलिया नवे टेस्ट चॅम्पियन

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना:

आयपीएल 2013 फायनल - मुंबई इंडियन्स जिंकली

आयपीएल 2015 फायनल - मुंबई इंडियन्स जिंकली

IPL 2017 फायनल - मुंबई इंडियन्स जिंकली

IPL 2019 फायनल - मुंबई इंडियन्स जिंकली

IPL 2020 फायनल - मुंबई इंडियन्स जिंकली

चॅम्पियन्स लीग 2013 फायनल - मुंबई इंडियन्सने जिंकली

आशिया कप 2018 फायनल - टीम इंडिया जिंकली

निदाहास ट्रॉफी 2018 फायनल – टीम इंडिया जिंकली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनल - भारताचा पराभव झाला.

Rohit Sharma
WTC 2023 Final: विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल! ICC कडून भारतासह 'या' 9 संघांनाही कोट्यवधींची बक्षीसं

रोहितचा रेकॉर्ड

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 84 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 62 सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने (India) 7 कसोटी, 26 वनडे आणि 51 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो गोलंदाजीत चांगला बदल करतो, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला नाही.

Rohit Sharma
WTC 2023 Final रोमांचक वळणावर! भारत - ऑस्ट्रेलियासाठी पाचवा दिवस ठरणार 'करो वा मरो'

टीम इंडियाचा पराभव झाला

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 234 धावाच करु शकला. अजिंक्य रहाणे वगळता एकाही फलंदाजाला सामन्याच्या दोन्ही डावात भारतासाठी चांगली कामगिरी करता आली नाही.

यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर हे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी भारतासाठी अर्धशतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com