WTC 2023 Final रोमांचक वळणावर! भारत - ऑस्ट्रेलियासाठी पाचवा दिवस ठरणार 'करो वा मरो'

कसोटी चॅम्पियनशीप फायनल रोमांचक वळणावर असून पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांना विजयाची संधी आहे.
WTC 2023 Final
WTC 2023 FinalDainik Gomantak
Published on
Updated on

WTC 2023 Final, India vs Australia, 4th Day report: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हलवर झालेल्या या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने 444 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात 3 बाद 164 धावा केल्या आहेत.

अद्याप भारताला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशी भारताकडून विराट कोहली 44 धावांवर आणि अजिंक्य राहणे 20 धावांवर नाबाद आहे.

WTC 2023 Final
WTC 2023 Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केली चेंडूशी छेडछाड? माजी क्रिकेटपटूच्या आरोपाने उडवली खळबळ

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही चांगली सुरुवात केली होती. दोघेही सकारात्मकही खेळत होते.

पण 8 व्या षटकात स्कॉट बोलंडने गिलला 18 धावांवर बाद केले. त्याचा कॅमेरॉन ग्रीनने झेल घेतला. त्याचा हा झेल वादग्रस्त ठरला. कारण ग्रीनने चेंडू खूप खाली झेलला होता. त्यामुळे चेंडू जमीनीवर लागला आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण तिसऱ्या पंचांनी गिलला बाद दिल्याने त्याला माघारी परतावे लागले.

पण, त्यानंतरही चेतेश्वर पुजारा रोहितला चांगली साथ देत होता. मात्र 20 व्या षटकात नॅथन लायनविरुद्ध रिव्हर्स स्विपचा फटका मारताना रोहित पायचीत झाला. रोहितने 60 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

त्याच्या पुढच्याच षटकात पुजाराला पॅट कमिन्सने यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीच्या हातून 27 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मात्र दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट आणि रहाणने विकेट्स पडू दिल्या नाहीत.

WTC 2023 Final
WTC Final 2023: लंडनमध्ये रोहित शर्माचा मोठा पराक्रम, तेंडुलकरचा मोडला 'हा' रेकॉर्ड!

तत्पुर्वी, या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 षटकांपासून 4 बाद 123 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने 41 धावांपासून आणि कॅमेरॉन ग्रीनने 7 धावांपासून खेळायला सुरुवात केली.

पण लॅब्युशेनने चौथ्या दिवशी सुरुवातीलाच 47 व्या षटकात 41 धावांवर विकेट गमावली. त्याला उमेश यादवनेने बाद केले. त्याचा झेल चेतेश्वर पुजाराने घेतला. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि ऍलेक्स कॅरी यांनी डाव सावरला होता.

त्यांची भागीदारीही रंगत होती. पण त्याचवेळी 63 व्या षटकात जडेजा गोलंदाजीला उतरला आणि त्याने या षटकातील अखेरचा चेंडू आऊटसाईड लेगला टाकला. त्यावेळी ग्रीनने तो चेंडू सोडण्याचा विचार केलेला, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरला आणि ग्रीनच्या ग्लव्ह्ज आणि पॅडला लागून थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे 25 धावा करून ग्रीनला माघारी परतावे लागले.

मात्र यानंतर कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरताना 93 धावांची भागीदारी केली. पण स्टार्कला 83 व्या षटकात मोहम्मद शमीने चूक करण्यास भाग पाडले. 41 धावांवर खेळणाऱ्या स्टार्कचा झेल विराट कोहलीने घेतला.

दरम्यान कॅरीने अर्धशतकही केले. पण पॅट कमिन्स 85 व्या षटकात 5 धावांवर बाद झाला. त्यालाही शमीनेच बदली क्षेत्ररक्षक अक्षर पटेलच्या हातून झेलबाद केले. या विकेटसह ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 84.3 षटकात 8 बाद 270 धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 173 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com