Panaji Municipal Election Result 2026
Babush Monserrate Panel Victory Dainik Gomantak

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Babush Monserrate Panel Victory: पणजी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला.
Published on

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला. भाजप आणि बाबूश मोन्सेरात प्रणीत 'टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी' पॅनेलने 30 पैकी तब्बल 27 जागांवर अभूतपूर्व विजय मिळवत पणजीवर आपली मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील 'आमी पणजेकार' पॅनेलला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शांत राहिलेल्या बाबूश यांनी "मी 13 तारखेलाच बोलेन" असे ठणकावून सांगितले होते आणि आजच्या निकालाने त्यांनी विरोधकांना कृतीतून चोख उत्तर दिले.

सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजप-बाबूश पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. पहिल्या सोळा वॉर्डांचे निकाल हाती येताच पणजी महानगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा बाबूश यांच्याच हाती जाणार, हे चित्र स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे चार माजी महापौर रोहित मोन्सेरात, विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर आणि उदय मडकईकर यांनी विजयाची परंपरा कायम राखली. विशेष म्हणजे, विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास संपादन केला. या संपूर्ण निकालात तुकाराम चिन्ननावर यांचा विजय सर्वात चर्चेत राहिला, कारण त्यांनी सर्वाधिक 713 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Elelction: पणजी महानगरपालिकेवर कुणाची सत्ता? निर्णय होणार मतपेटीत बंदिस्त; 48 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

त्याचवेळी उत्पल पर्रीकर यांच्या गटासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला. त्यांचे खंदे समर्थक आणि माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना पराभवाचा धक्का बसला असला, तरी त्यांच्या मुलाने, लिओनिड फुर्तादो यांनी प्रभाग 7 मधून विजय मिळवून कुटुंबाची प्रतिष्ठा राखली. उत्पल गटाचे इतर दोन उमेदवार जॅक सुखिजा (वॉर्ड 17) आणि लिबेर्टा मेंडिस (वॉर्ड 29) हे अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी झाले. विशेष म्हणजे, सुखिजा यांचा विजय अवघ्या 2 मतांनी झाला, तर मेंडिस 31 मतांनी विजयी झाल्या. या दोघांनाही विजयासाठी फेरमतमोजणीची प्रतीक्षा करावी लागली, ज्यामुळे निकालातील नाट्य शेवटपर्यंत टिकून होते.

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election: उत्‍पल मांडताहेत पणजीच्‍या व्‍यथा! ‘आमी पणजेकार’चा घरोघरी प्रचार; सत्ताबदलाचा निर्धार

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार बाबूश मोन्सेरात यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. त्यांनी हा विजय पणजीवासीयांच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगत विरोधकांवर सडकून टीका केली. "ही निवडणूक माझ्यासाठी 'फायनल' होती आणि पणजीच्या जनतेने मला दिलेल्या पाठिंब्याने विरोधकांना वास्तव दाखवून दिले," असे ते म्हणाले.

प्रचारादरम्यान विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या 'फॅमिलीराज'च्या टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. बाबूश म्हणाले की, "आम्ही कोणी नियुक्त केलेले प्रतिनिधी नाही, तर जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. लोकशाहीत जनतेचा कौल हाच अंतिम असतो आणि फॅमिलीराज म्हणणाऱ्यांना मतदारांनीच आज गप्प केले." या निकालाने पणजीच्या (Panaji) राजकारणात बाबूश मोन्सेरात यांचे स्थान किती अढळ आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून उत्पल पर्रीकर यांच्या राजकीय प्रवासासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election: तीस जागांसाठी 69 उमेदवार, महापालिका निवडणुकीत आठ जणांनी घेतली माघार; 'या' उमेदवारांचे अर्ज मागे

महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार

वॉर्ड क्र. व विजेते (भाजप-२७)

1. युतिका जांबावलीकर- 396

2. कॅरोलिना पो- 559

3. मार्गारिटा फर्नांडिस- 332

4. रोहित मोन्सेरात- 402

5. किशोर शास्त्री- 472

6. बेन्टो लॉरेना 500

8. करिना शिरोडकर- 570

9. कबीर मखिजा- 519

10. प्रसाद आमोणकर-345

11. तुकाराम चिन्ननावर- 713

12. वर्षा शेट्ये- 478

13. उदय मडकईकर- 563

14. प्रज्योत वायंगणकर- 525

15. शायनी चोपडेकर-493

16. अस्मिता केरकर- 287

18. कृष्णा शिरोडकर- 443

19. निकिता नाईक-349

20. शुभम चोडणकर- 338

21. मनिषा मणेकर- 374

22. दीक्षा माईणकर- 404

23. विद्या गडकर- 429

24. करण पारेख- 343

25. कीर्ती साखळकर- 361

26. वसंत आगशीकर 377

27. विठ्ठल चोपडेकर- 320

28. रुपेश हळर्णकर 429

30. सिल्वेस्टर फर्नाडिस-427

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipality: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गोंधळ, शाब्दिक वाद! महानगरपालिकेची सभा गाजली

वॉर्ड क्र. व विजेते (पणजेकार -3)

7. लिओनिड फुर्तादो- 434

17. जॅक सुखिजा-344

29. लिबेर्टा मेंडिस- 324

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com