

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतील अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या ७७ पैकी ८ जणांनी आज माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ३० जागांसाठी ६९ उमेदवार असून, त्यापैकी २३ ठिकाणी दुरंगी, ६ जागांवर तिरंगी आणि एका ठिकाणी बहुरंगी लढत पहायला मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे, महापौर रोहित मोन्सेरात यांच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये त्यांच्याविरोधात दोन उमेदवार असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.
या निवडणुकीत भाजपप्रणित बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या सत्ताधारी पॅनलविरोधात उत्पल पर्रीकर-दत्तप्रसाद नाईक-सुरेंद्र फुर्तादो-वैदेही नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील ‘आमी पणजेकार’ हे पॅनल निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहे. आमदार मोन्सेरात यांनी ३० ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.
परंतु ‘आमी पणजेकार’ पॅनलने सर्व प्रभागांत उमेदवार दिले असल्याने या निवडणुकीकडे केवळ पणजीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे आणि सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
...या उमेदवारांचे अर्ज मागे
उमेदवारी मागे घेण्याच्या आजच्या निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत आठ उमेदवारांनी माघार घेतली. त्यात प्रभाग १ मधून दोड्डामणी लीना, प्रभाग आठमधून पो जेन, प्रभाग १० मधून याडल्ली राहुल, प्रभाग १५ मधून पो जॉन, प्रभाग १६ मधून प्रतिभा ढगे-बोरकर, प्रभाग १७ मधून फालेरो जॉर्डन, प्रभाग १८ मधून उदय च्यारी आणि प्रभाग २४ मधून आमद खान यांचा समावेश आहे.
रिंगणातील उमेदवार असे...
प्रभाग - गट - उमेदवार
१ एसटी महिला - दामिनी कुंकळ्येकर, रोशन मार्टिन्स, युतिका जांबावलीकर
२ ओबीसी महिला - कॅरोलिना पो, उमा वळवईकर
३ ओबीसी महिला - मार्गारिडा फर्नांडिस - पो जेन
४ सर्वसाधारण - रोहित मोन्सेरात, पो जॉन, सिल्वेरा आग्नेलो
५ सर्वसाधारण - सुदिन कामत, किशोर शास्त्री
६ ओबीसी - शीतल नाईक, सिल्व्हेस्टर बेंटो लॉरेन
७ सर्वसाधारण - संजीव देसाई, लिओनीड फुर्तादो
८ ओबीसी महिला - शुभदा शिरगावकर, करिना शिरोडकर
९ सर्वसाधारण - सुरेंद्र फुर्तादो, कबीर पिंटो माखिजा
१० सर्वसाधारण - प्रसाद आमोणकर, विष्णू नाईक
११ सर्वसाधारण - तुकाराम चिनान्नवर, गौरव नाईक
१२ सर्वसाधारण - ब्रिजेश कवळेकर, शबनम खान, वर्षा शेट्ये
१३ सर्वसाधारण - नीळकंठ च्यारी, उदय मडकईकर
१४ ओबीसी - मदन फातर्पेकर, प्रज्योत वायंगणकर
१५ ओबीसी - शायनी चोपडेकर, सूरज नाईक
१६ महिला - अस्मिता केरकर, प्रांजल नाईक
१७ सर्वसाधारण - जॉर्ज डेनिस एडवर्ड, जॅक सुखिजा
१८ सर्वसाधारण - आशिष नागवेकर, कृष्णा शिरोडकर
१९ महिला - निकिता नाईक, देवोदिता परेरा
२० सर्वसाधारण - गोविंद चोडणकर, शुभम शिरोडकर, महेश रेवणकर
२१ ओबीसी - मनीषा मणेरकर, भालचंद्र पेडणेकर
२२ महिला - नेहा कवळेकर, दीक्षा माईणकर
२३ महिला - विद्या गडकर आणि ज्योती मसुरकर
२४ सर्वसाधारण - शिवदास नाईक रायकर, नितीन नार्वेकर, करण पारेख
२५ महिला - माधवी आमोणकर, कीर्ती साखळकर
२६ सर्वसाधारण - वसंत आगशीकर, शुभदा धोंड, राजेश केळुस्कर, नम्रता सरदेसाई, संजय सरमळकर
२७ ओबीसी - विठ्ठल चोपडेकर, वासुदेव मणेरकर
२८ सर्वसाधारण - दत्तराज हळर्णकर, रूपेश हळर्णकर, घन:श्याम नास्नोडकर
२९ महिला - सँड्रा दा कुन्हा, ई आचारी लिबेर्टा मेंडिस
३० सर्वसाधारण - सिल्वेस्टर फर्नांडिस, वैभव साळगावकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.