Mumbai Indians Team News Updates
Mumbai Indians Team News UpdatesDainik Gomantak

'मुंबई इंडियन्स'चे परदेशी खेळाडू उकाड्याने त्रस्त; व्हिडिओ व्हायरल

मुंबई संघाने व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Published on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होणार आहे. फायनल 29 मे रोजी होणार असून सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. (Mumbai Indians Team News Updates)

Mumbai Indians Team News Updates
चर्चिल ब्रदर्सला विजयाचा दिलासा

दरम्यान, मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मासह उर्वरित खेळाडू सराव शिबिरात मस्ती करताना एका व्हिडिओत दिसले. परदेशी खेळाडूही उन्हाचा त्रास सहन करताना दिसत होते. आम्हाला अशा हवामानात (Climate) राहण्याची सवय नाही. हे स्वतः खेळाडूंनीच सांगितले आहे.

मुंबई फ्रँचायझीने टीम व्हिडिओ शेअर केला
मुंबई फ्रँचायझीने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. याची सुरुवात कर्णधार रोहितपासून होते. आत प्रवेश करताच तो प्रथम दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसशी बोलतो आणि पत्रकार परिषदेच्या तयारीसाठी डीबी असे नाव घेऊन पुढे जातो.

Mumbai Indians Team News Updates
क्रिकेटपटू विराट कोहलीने कॉफी व्यवसायात केला प्रवेश

यानंतर मैदानाचा सीन दाखवला आहे, जिथे इशान किशन आणि बाकीचे खेळाडू वॉर्मअप करताना दिसत आहेत. यानंतर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणतात की बोंडी (शेन बाँड, गोलंदाजी प्रशिक्षक) भरपूर कॉफी पितात.

इथून कॅमेरा आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसकडे जातो. ब्रेव्हिस जमिनीवर बसलेला दिसतो. तो कॅमेरासमोर म्हणतो- 'मी अशा हवामानात कधीच राहिलेलो नाही. इथे खूप गरम आहे. यानंतर उपकर्णधार कायरॉन पोलार्ड म्हणतो, आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे आम्हाला अनुभव आहे. पावसात क्रिकेट (Cricket) खेळले जाऊ शकत नाही, त्यामुळे कितीही उकाडा असला तरी फरक पडत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com