क्रिकेटपटू विराट कोहलीने कॉफी व्यवसायात प्रवेश केला असुन, या व्यवसायाच्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत. Rage Coffee क्रिकेटपटू विराट कोहलीने पॅकेज्ड कॉफी उत्पादन निर्माता कंपनी Rage Coffee मध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे. (indian Cricketer Virat Kohli enters coffee business)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) आता कॉफीच्या व्यवसायात उतरला आहे. कोहलीने रेज कॉफी या पॅकेज्ड कॉफी उत्पादने बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. तसेच, रेज कॉफीने (Coffee Company) विराट कोहलीला आपला ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ (Brand Ambassador) बनवले आहे. तथापि, नवी दिल्ली-मुख्यालय असलेल्या स्टार्टअप कंपनीने कोहलीने केलेल्या गुंतवणुकीची रक्कम अद्याप उघड केलेली नाही.
याआधी ऑगस्ट 2021 मध्ये, रेज कॉफीने सिक्थ सेन्स व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील सिरीज ए फंडिंग फेरीचा भाग म्हणून USD 5 दशलक्ष जमा केले होते.
किती केली गुंतवणूक?
रेज कॉफीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असुन. कंपनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये विक्री करत आहे. विराट कोहलीने स्टार्टअप कंपनीत किती स्टॉक खरेदी केले आणि किती रक्कम गुंतवली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. देशभरात आपली उपस्थिती अधिक वाढवण्याची त्यांची योजना असल्याचं रेज कॉफी कंपनीने सांगितले. तसेच कंपनी भांडवल विपणन आणि वितरणासाठी वापरणार असल्याचे रेज कॉफीने माहिती दिली. यासह, उत्पादन वाढविण्यासाठी, नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये अधिक चांगल्या लोकांना जोडण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी, सिक्स्थ सेन्स व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील रेज कॉफीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 50 लाख दशलक्ष भांडवल उभारले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.