MS Dhoni Birthday: विराटपासून ते रैनापर्यंत... माहीने टीम इंडियाला दिले 'हे' 5 मॅच विनर खेळाडू!

MS Dhoni Birthday: आज अर्थात 7 जुलैला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस असून तो 42 वर्षांचा झाला आहे.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni Birthday: आज अर्थात 7 जुलैला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस असून तो 42 वर्षांचा झाला आहे. धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची येथे झाला, तेव्हा रांची हे बिहार राज्याचा भाग होते आणि आज ते झारखंडची राजधानी आहे. महेंद्रसिंग धोनीने 2008 साली भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले.

दरम्यान, धोनीने संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याच्यासमोर अनेक आव्हाने होती, ज्यामध्ये तरुणांना संधी देणे आणि भविष्यासाठी संघ तयार करणे. या सर्व आव्हानांचा सामना करत धोनीने भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक क्षण दिले.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC वर्ल्ड टी-20 (2007), क्रिकेट वर्ल्ड कप (2011) आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) जिंकली आहे. याशिवाय 2009 मध्ये भारत (India) प्रथमच कसोटीत नंबर वन बनला होता.

MS Dhoni
Team India: टीम इंडियात पहिल्यांदाच खेळणार 'या' राज्याची महिला क्रिकेटर, निवड होताच रचला इतिहास

दुसरीकडे, धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली अशा 5 खेळाडूंना संधी दिली, जे टीम इंडियासाठी (Team India) मॅच विनर ठरले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला हे 5 मॅचविनर खेळाडू मिळाले नसते, तर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतरच भारतीय क्रिकेट संघाचा सूर्य मावळला असता. आज या 5 क्रिकेटपटूंचा डंका जागतिक क्रिकेटमध्ये वाजत आहे.

1. विराट कोहली

धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. धोनीनेच विराट कोहलीला वनडेत तिसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी दिली. कोहलीची चांगली कामगिरी पाहून धोनीने त्याला कसोटीतही संधी दिली.

2011-12 मध्ये विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यशस्वी होऊ शकला नाही, पण धोनीने त्याला वारंवार संधी दिली. त्यानंतर कोहलीनेही अर्धशतक झळकावले. अॅडलेडमध्ये शतक झळकावून कोहलीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

2012 मध्ये पर्थमध्ये, सिलेक्टर्संना कोहलीच्या जागी रोहितला संधी द्यायची होती, परंतु धोनीने कोहलीला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.

ही गोष्ट खुद्द टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितली होती की, त्यावेळी मी उपकर्णधार होतो आणि धोनीच्या सांगण्यावरुन आम्ही रोहितऐवजी कोहलीची निवड केली होती.

MS Dhoni
Team India Schedule: टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर अवध्या पाच दिवसात करणार 'या' देशाचा दौरा; वेळापत्रकाची घोषणा

2. रोहित शर्मा

सतत खराब फॉर्म असतानाही धोनीने रोहित शर्माला संधी दिली. यामुळे त्याची संपूर्ण कारकीर्दच बदलून गेली. रोहितला वनडेत सलामीवीर बनवण्यात धोनीचे सर्वात मोठे योगदान आहे. 2013 मध्ये धोनीने जेव्हा त्याला फलंदाजी करण्याची संधी दिली, तेव्हापासून रोहित शर्माचा वेगळाच फॉर्म पाहायला मिळत आहे. रोहित शर्माला 'हिटमॅन' बनवण्यात माहीचा मोठा हात आहे.

3. रविचंद्रन अश्विन

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा आज जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. धोनीने अश्विनला आयपीएल 2010 मध्ये पहिल्यांदा खेळण्याची संधी दिली. अश्विनने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.

अश्विन धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळत होता. धोनीने त्याची प्रतिभा पाहिली आणि नंतर त्याला भारतीय संघात समाविष्ट केले, ज्यामुळे अश्विनला भारतीय संघात स्थान मिळाले.

अश्विन 2010 मध्ये संघात आला आणि त्यानंतर एक वर्षानंतर 2011 च्या विश्वचषकातही त्याची निवड झाली. अश्विनला कसोटीतही खेळण्याची संधी मिळाली.

MS Dhoni
MS Dhoni: दिलदार माही! सिक्युरिटी गार्डच्या मदतीला धावला अन् थेट गाडीवरुन... व्हिडिओ व्हायरल

4. रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा आज टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर बनला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत जडेजाला तोड नाही. जडेजाला टीम इंडियात आणण्यामागे धोनीचा हात आहे.

रवींद्र जडेजा धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेकडून खेळत असे आणि त्याचा फेव्हरेट असल्याने धोनीने त्याला संघात संधी दिली. धोनीने त्याला संघातून सोडले नाही आणि त्याला वारंवार संधी देत ​​राहिला. याच कारणामुळे जडेजा महान अष्टपैलू खेळाडू बनला.

MS Dhoni
MS Dhoni: कॅप्टन धोनीच्या मनाचा मोठेपणा! IPL ट्रॉफी स्विकारताना रायुडू-जडेजाला घेतलं बोलावून, पाहा Video

5. सुरेश रैना

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची मैत्री खास राहिली आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली रैनाला खूप संधी दिली होती.

धोनी रैनाबद्दल म्हणाला होता की, तो एक महान खेळाडू आहे, त्यामुळे आपण त्याला सपोर्ट करायला हवे. जर आपण त्याला साथ दिली नाही तर तो आपला नैसर्गिक खेळ खेळणार नाही आणि स्वस्तात बाद होईल.

धोनीने रैनाला सतत खेळण्याची संधी दिली, ज्यामुळे रैनाची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील धोकादायक फलंदाजांमध्ये गणना होते. याच कारणामुळे रैनाला बनवण्यात धोनीचा मोठा हात असल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com