Indian Cricket Team: बांगलादेशमध्ये 9 जुलैपासून सुरु होणाऱ्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी भारताने 18 सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. आसामच्या (Assam) गोलाघाट जिल्ह्यातील 20 वर्षीय उमा छेत्रीने भारतीय संघात स्थान मिळवून इतिहास रचला आहे. भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईशान्येकडील राज्यातून निवड झालेली ती पहिली खेळाडू आहे.
तिच्या या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करताना, राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटमध्य लिहिले की, 'आसाममधील क्रिकेटने एका गौरवशाली नवीन अध्यायात प्रवेश केला आहे, कारण आम्ही भारतीय महिला संघात आमचे पहिले प्रतिनिधित्व अभिमानाने पाहत आहोत.
निळी जर्सी परिधान करणारी आपल्या राज्यातील पहिली खेळाडू ठरल्याबद्दल उमा छेत्रीचे अभिनंदन.' ते पुढे म्हणाले की, ''आम्ही उमा आणि भारतीय संघाला आगामी बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यासाठी पाठिंबा देऊ. आम्ही तिला मैदानावरील उत्तुंग यशासाठी शुभेच्छा देतो.''
राज्यातील बोकाखाट येथील कंदुलिमारी या छोट्याशा गावातून उमा येते. उमाचा भाऊ विजय छेत्री याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, "आम्हाला काल रात्री उशिरा ही बातमी मिळाली. आज सकाळी आम्ही तिच्याशी बोललो. आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे.'' पाच भावंडांमध्ये उमा सर्वात लहान आणि एकुलती एक बहीण आहे.
उमाने पहिल्यांदा प्लास्टिकची बॅट उचलली तेव्हा तिला क्रिकेटची ओढ लागली. विजयने पुढे सांगितले की, 'तिने जेव्हा पहिल्यांदा प्लॅस्टिकची बॅट धरली तेव्हा तिची या खेळातील आवड वाढली. पाचवी किंवा सहावी इयत्तेत असतानाच तिने बोकाखाट स्टेडियममध्ये सराव आणि प्रशिक्षण सुरु केले होते.'
हरमनप्रीत कौर (क), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, एस मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.
हरमनप्रीत कौर (क), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.