India vs Ireland T20I Series Schedule: भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असला तरी जुलैपासून वेळापत्रक व्यस्त आहे. भारतीय संघाला 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर लगेचच भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.
भारतीय संघ वर्षभरानंतर पुन्हा एकदा 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेला 18 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातील अखेरचा सामना खेळल्यानंतर लगेचच पाच दिवसाच भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना खेळताना दिसणार आहे.
आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी20 मालिका 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या मालिकेतील तिन्ही टी20 सामने डब्लिनच्या सीमेवरील मलाहाईड येथे होणार आहेत.
या दौऱ्याबद्दल आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॅरेन ड्युट्रोम यांनी म्हटले, 'भारतीय पुरुष संघाचे गेल्या 12 महिन्यात दुसऱ्यांदा आयर्लंडमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही 2022 मध्ये सर्व तिकिट्स विकले गेलेले दोन सामने पाहिले होते, त्यामुळे यावेळी तीन सामन्यांची मालिका चाहत्यांना आणखी मजा घेण्याची संधी देईल.'
याशिवाय ड्युट्रोम यांनी बीसीसीआयचे आभारही मानले. त्यांनी म्हटले 'भारतयी संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आयर्लंडचाही समावेश केल्याबद्दल आम्ही मनापासून बीसीसीआयचे आभार मानतो. तसेच चाहत्यांसाठी अनुकूल वेळापत्रक सुनिश्चित करण्यासाठी आमच्याबरोबर काम करण्याबद्दलही आभार. शुक्रवारी आणि रविवारी होणारे सामने चाहत्यांना आनंद घेण्याची संधी आणखी वाढवतील, अशी आशा आहे.'
भारताचा हा एकूण आयर्लंडचा चौथा दौरा असणार आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये एकमेव वनडे सामना आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर 2018 आणि 2022 साली भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिका आयर्लंडला खेळल्या.
18 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
20 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
23 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.