MS Dhoni Giving lift to security guard on bike Video goes viral: कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी भारतातील लोकप्रिय व्यक्तीमत्त्वांपैकी एक आहे. धोनी केवळ त्याच्या मैदानातील कामगिरीमुळेच नाही, तर त्याच्या स्वभावामुळे आणि साध्या राहणीमानामुळेही बऱ्याचदा क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. नुकताच त्याच्या उदारतेचे दर्शन देणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सध्या इंटरनेटवर धोनीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात धोनी त्याच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्या फार्म हाऊसच्या गेटपर्यंत सोडताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते धोनी त्याच्या रांचीतील फार्महाऊसमध्ये बाईकवरून चक्कर मारत असून यावेळी त्याने त्याच्या सुरक्षा रक्षकाला बाईकवर बसवले आणि गेटपर्यंत सोडले. त्यानंतर तो त्याचा निरोप घेऊन पुन्हा बाईकवर परत गेला. दरम्यान, धोनीचा हा व्हिडिओपाहून त्याचे फार्म हाऊस किती मोठे असेल याचा अंदाज येऊ शकतो.
दरम्यान, भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनी येत्या 7 जुलैला त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी चाहत्यांची तयारीही सुरु झाली असून सोशल मीडियावरही अनेक पोस्ट व्हायरल होत आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पण धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली. सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.
धोनीला भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत. तो तीन आयसीसी विजेतीपदे जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय कर्णधार आहे. तसेच भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षकही आहे.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.