Mohammed Shami Retirement: "...त्या दिवशी क्रिकेट सोडेन", मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे विधान

Mohammed Shami Retirement Statement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर असला तरी, त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी क्रीडा जगतात उधाण आले होते.
Mohammed Shami opens up on retirement
Mohammed Shami RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर असला तरी, त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी क्रीडा जगतात उधाण आले होते. अखेर या सर्व अटकळांना पूर्णविराम देत शमीने आपल्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे. "जोपर्यंत माझं मन रमायचं थांबत नाही, तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही," अशा शब्दांत त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

निवृत्तीच्या विचारावर शमीचे स्पष्ट मत

एका पॉडकास्टमध्ये बोलताना शमीने सांगितले की, निवृत्तीचा विचार मनात येणे म्हणजेच तुम्ही मानसिकदृष्ट्या थकल्याचे लक्षण आहे. तो म्हणाला, "ज्या दिवशी मला सकाळी उठल्यावर क्रिकेटचा कंटाळा येईल किंवा आळस जाणवेल, त्याच क्षणी मी या खेळाला अलविदा करेन. पण सध्या मी ना थकालो आहे ना मला कंटाळा आला आहे. मी अजूनही खेळाचा पूर्ण आनंद घेत आहे आणि माझे शरीर साथ देत आहे." शमीच्या मते, निवृत्तीचे विचार खेळाडूला मागे खेचतात आणि जोपर्यंत सकारात्मक निकाल मिळत आहेत, तोपर्यंत थांबण्याचा प्रश्नच येत नाही.

Mohammed Shami opens up on retirement
Illegal Gambling Goa: होंडा येथे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांना अटक, 52,300 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्यही जप्त

आयपीएल २०२६ आणि आगामी प्रवास

गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे शमी संघाबाहेर आहे. घरगुती क्रिकेटमध्ये ६७ बळी मिळवूनही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत असले, तरी शमीचा आत्मविश्वास डगमगलेला नाही. आगामी आयपीएल २०२६ मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनऊने १० कोटी रुपयांची मोठी बोली लावून त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. "लखनऊ संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवण्यासाठी मी माझे १०० टक्के योगदान देईन," असेही शमीने यावेळी ठामपणे सांगितले.

Mohammed Shami opens up on retirement
Goa Weather: थंडीने पल्लवित केलेल्‍या आशा उष्‍म्‍याने मावळल्‍या! काजू, आंबा बागायतदारांची व्‍यथा; दुसरा मोहोर करपला

संघ निवड आणि स्वतःची भूमिका

संघातील पुनरागमनाबाबत बोलताना शमीने स्पष्ट केले की, मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी करणे हे त्याचे काम आहे आणि निवड करणे हे व्यवस्थापनाच्या हातात आहे. स्वतःच्या लयीवर (Rhythm) लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे त्याने मान्य केले. भविष्यातील नशिबापेक्षा आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर त्याचा अधिक विश्वास आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या शमीसाठी आता आयपीएलमधील कामगिरी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा उघडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com