Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

मदत मागितल्याने बाहेर पडल्या विराट कोहली अन् जोस बटलरच्या भावना

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने चाहत्यांशी एक किस्सा शेअर केला.
Published on

अखेर, ते घडले ज्यासाठी लाखो क्रिकेट चाहते दीर्घकाळ वाट पाहत होते. IPL 2022 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच त्याच्या रंगात दिसला. गुजरात टायटन्सविरुद्ध, विराट कोहलीने गुजरातविरुद्ध 54 चेंडूत 73 धावा केल्या आणि आपल्या संघाला 8 विकेट्सने घवघवीत विजय मिळवून दिला आहे. विराट कोहलीने या मोसमात केवळ दुसरे अर्धशतक झळकावले आणि विशेष म्हणजे त्याचे पहिले अर्धशतकही याच संघाविरुद्ध केले होते. मात्र, त्या डावाच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. (Virat Kohli made a half century)

Virat Kohli
मॅथ्यूचा फिरला माथा! अन् मॅच रेफरीने गुजरात टायटन्सच्या विकेटकिपरला फटकारले

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने चाहत्यांशी एक किस्सा शेअर केला. ज्यामध्ये विराट कोहलीने सांगितले आहे की, राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याचा सलामीवीर जोस बटलर त्याच्याशी बोलण्यासाठी देखील आला होता. बटलरने त्याला काही प्रश्न विचारले पण विराट कोहलीने दिलेले उत्तर खरोखरच या खेळाडूची वेदना दर्शवते आहे.

बटलरने मदत मागितली, मग काय म्हणाला विराट कोहली?

विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना त्याने सांगितले की, राजस्थानचा फलंदाज जोस बटलर सामना संपल्यानंतर त्याला काहीतरी विचारण्यासाठी आला होता आणि त्यावर विराट कोहली म्हणाला की, 'राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर बटलर मला काहीतरी विचारण्यासाठी आला होता. मी म्हणालो की तू ऑरेंज कॅप घातली आहे. तुला मला काही विचारायचे आहे? आणि मी धावा करू शकत नाहीये. त्यानंतर आम्ही जोरजोरात हसायला लागलो. यानंतर विराट कोहली आणि बटलर हसायला लागले, पण या गोष्टीने या दिग्गज फलंदाजाच्या आतल्या वेदना उघड झाल्या.

विराट कोहली रंगात आला

गुरुवारी झालेल्या सामन्यात गुजरातने बंगळुरूला 169 धावांचे टागरेट दिले होते. प्रत्युत्तरात कर्णधार डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि विराट कोहलीने बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांनी 115 धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला म्हणायला हरकत नाही. यादरम्यान विराट कोहलीने शानदार अर्धशकत झळकत 73 धावा केल्या तर डु प्लेसिसच्या बॅटमधून 44 धावा झाल्या. यानंतर मॅक्सवेलने 18 चेंडूत नाबाद 40 धावा करत बंगळुरूला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. मात्र, अजूनही बेंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलेली नाहीये. दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मोठा दावेदार ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com