बुमराहला तोड नाही! वनडेमध्ये बनला जगातील नंबर 1चा बॉलर

दोन वर्षांनंतर तो पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे तर या जबरदस्त फॉर्ममध्ये त्याने सर्वांनाच मागे टाकले.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा त्याचा जलवा दाखवला दाखवला आहे. दोन वर्षांनंतर तो पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे तर या जबरदस्त फॉर्ममध्ये त्याने सर्वांनाच मागे टाकले. बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल एकदिवसीय सामन्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झाला आहे. (Jasprit Bumrah became the world No 1 bowler in ODIs)

Jasprit Bumrah
INDvsENG: 'ऑन फील्ड डक-ऑफ फील्ड डक', जस्सीच्या पत्नीने इंग्लंड संघाला केलं ट्रोल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी वनडे खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह 718 गुणांसह नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. मंगळवारी 12 जुलैला झालेल्या ओव्हल वनडेत त्याने 19 धावांमध्ये 6 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे बुमराहने पाच स्थानांची झेप घेतली आहे.

बुमराह दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा नंबर-1 गोलंदाज बनला आहे

जसप्रीत बुमराहने दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी तो फेब्रुवारी 2020 मध्ये नंबर-1चा बॉलर बनू शकला नव्हता. त्यानंतर न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याला प्रथम क्रमांकावरून हटवले होते. तर अशी कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय ठरला आहे. बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍येही नंबर-1 गोलंदाज बनला आहे. जरी तो सध्या या क्रमवारीमध्ये 28 व्या क्रमांकावर आहे. कसोटीत बुमराह त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावरती आहे.

बुमराह कपिल देव नंतर दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे जो वनडेमध्ये नंबर-1 बॉलर बनला आहे. जर आपण एकंदरीत बोललो तर बुमराह आणि कपिल देव यांच्या व्यतिरिक्त, मनिंदर सिंग, अनिल कुंबळे आणि रवींद्र जडेजा हे देखील जगातील नंबर-1 गोलंदाजांपैकी एक आहेत.

Jasprit Bumrah
Sri Lanka Crisis: डेव्हिड वॉर्नरने दिला श्रीलंकन नागरिकांना खास संदेश

शमीला 4 स्थानांचा फायदा, जडेजाला तोटा

याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या. याचा त्यांना रँकिंगमध्येही फायदा झाला. शमीने 4 स्थानांची झेप घेतली असून तो आता 23व्या क्रमांकावर पोहोचला आहे तसेच याशिवाय फिरकीपटू रवींद्र जडेजाचे 6 स्थानांचे नुकसान झाले असून. तो 40 व्या क्रमांकावरती घसरला आहे.

टीम इंडियाने इंग्लंडवर 10 विकेट्सने मात केली आहे

ओव्हल एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 110 धावांवरती आटोपला आणि संघाकडून कर्णधार जोस बटलरला केवळ 30 धावा करता आल्या. या सामन्यात बुमराहने 7.2 षटके टाकत 19 धावांमध्ये 6 मोठे बळी घेतले आहेत. बुमराहला सामनावीर म्हणून देखील गौरवण्यात आले आहे.

बुमराहशिवाय मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 114 धावा करत हा सामना 10 गडी राखून जिंकला आहे. सलामीवीर रोहित शर्मा नाबाद 76 आणि शिखर धवनने 31 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com