INDvsENG: 'ऑन फील्ड डक-ऑफ फील्ड डक', जस्सीच्या पत्नीने इंग्लंड संघाला केलं ट्रोल

संजना गणेशनचा इंग्लंडमधून मस्ती करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Sanjana Ganesan Trolls England Viral Video
Sanjana Ganesan Trolls England Viral VideoTwitter
Published on
Updated on

Sanjana Ganesan Trolls England Viral Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना गारद केली आहे. त्याचवेळी त्याची पत्नी संजना गणेशन मैदानाबाहेर इंग्लंड संघासोबत मस्ती करतांना दिसली. संजना गणेशनचा इंग्लंडमधून मस्ती करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sanjana Ganesan Trolls England Viral Video
ICC Rankings मध्ये टीम इंडियाचा जलवा, या बाबतीत ठरली जगातील पहिली टीम

या व्हिडीओमध्ये संजना इंग्लंडच्या फलंदाजांना शून्यावर आऊट केल्यानंतर संजना मजा मस्ती करताना दिसून आली. तिचा पती बुमराहने या सामन्यात 7.2 षटकात 19 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. बुमराहच्या दमदार कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

व्हिडिओमध्ये संजना म्हणाली, "आज फूडकोर्ट इंग्लिश चाहत्यांनी भरले आहे कारण त्यांना क्रिकेट बघायचे नाही. आम्हाला 'डक रॅप' मिळाला आहे कारण आम्हाला हे बघायचे आहे की बदक मैदानाबाहेर कसे आहे, कारण मैदानावरील बदके अगदी विलक्षण आहेत."

Sanjana Ganesan Trolls England Viral Video
Sri Lanka Crisis: डेव्हिड वॉर्नरने दिला श्रीलंकन नागरिकांना खास संदेश

या सामन्यात यजमान इंग्लंडला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पहिली खेळी करून इंग्लंडचा संघ 110 धावांत गारद झाला. यानंतर टीम इंडियाने 18.4 षटकात एकही विकेट न गमावता लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 आणि मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. त्याचवेळी फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची नाबाद खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com