Sri Lanka Crisis: डेव्हिड वॉर्नरने दिला श्रीलंकन नागरिकांना खास संदेश

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या लोकांसाठी खास संदेश दिला आहे.
David Warner
David WarnerDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Economic Crisis: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकन नागरिकांना खास संदेश दिला आहे. देशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईसह श्रीलंका सात दशकांहून अधिक काळातील सर्वात वाईट संकटातून जात आहे.

दरम्यान, 24 जून रोजी आर प्रेमदासा स्टेडियमवर तीन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला मिळालेल्या प्रतिसादाने कर्णधार अ‍ॅरॉन फिंच भारावून गेला.

David Warner
Sri Lanka: दुबईला पळून जाताना राष्ट्रपतींना रोखलं, 'अर्थमंत्र्यांना पाहताच प्रवाशांनी...'

सोमवारी, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या समाप्तीच्या वेळी, वॉर्नरने इंस्टाग्रामवर (Instagram) श्रीलंकेबद्दल (Sri Lanka) कृतज्ञता व्यक्त केली. वॉर्नर म्हणाला, "अत्यंत कठीण काळात इथे आमची यजमान्यता केल्याबद्दल श्रीलंकन नागरिकांचे (Citizens) आभार. इथे आम्हाला आवडणारा सामना खेळू शकलो याबद्दल कृतज्ञ आहोत. तुम्ही आमचे मनापासून स्वागत केले. जे की आम्ही हा प्रवास कधीही विसरणार नाही.”

वॉर्नर पुढे म्हणाला, "मला तुमचा देश खूप आवडतो, कारण तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते आणि तुम्ही आमचे नेहमी चांगल्या पद्धतीने स्वागत करता, त्याबद्दल धन्यवाद."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com