

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना अनेक सामन्यांमध्ये 'पर्पल कॅप' आपल्या नावावर करणाऱ्या अंशुल कंबोजसाठी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा (LSG) ५९ वा सामना एखाद्या भयानक स्वप्नासारखा ठरला. या सामन्यापूर्वी तो या मोसमातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक मानला जात होता, परंतु लखनौच्या इकाना स्टेडियमवर त्याची अशी काही धुलाई झाली की त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अंशुलने या सामन्यात अवघ्या २.४ षटकांत तब्बल ६३ धावा लुटवल्या आणि त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
या सामन्यात लखनौच्या फलंदाजांनी अंशुल कंबोजला लक्ष्य केले. अंशुलने टाकलेल्या एकूण १६ चेंडूंमध्ये त्याला तब्बल ८ षटकार (Sixes) ठोकण्यात आले. त्याच्या गोलंदाजीवर आधी मिचेल मार्शने वादळ आणले. अंशुलच्या दुसऱ्या षटकात मार्शने सलग ४ चेंडूंमध्ये ४ तुफानी षटकार ठोकले.
त्यानंतर १७ व्या षटकात जेव्हा अंशुल पुन्हा गोलंदाजीसाठी आला, तेव्हा लखनौला विजयासाठी २४ धावांची गरज होती. यावेळी क्रीजवर असलेल्या निकोलस पूरनने अंशुलच्या सलग ४ चेंडूंवर ४ षटकार मारत सामना लखनौच्या खिशात टाकला.
एकाच आयपीएल सामन्यात सर्वाधिक ८ षटकार खाणारा अंशुल कंबोज हा आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी २०२३ च्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्याविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) रिंकू सिंगने सलग ५ षटकार ठोकले होते आणि त्या सामन्यात यश दयालला एकूण ८ षटकार बसले होते. आता अंशुल कंबोजची अवस्थाही तशीच झाली आहे.
अंशुल कंबोजने २.४ षटकांत दिलेली ६३ धावांची ही खेळी चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात महागडी गोलंदाजी ठरली आहे. अंशुलने ८ षटकारांशिवाय ३ चौकारही खाल्ले. चेन्नईसाठी सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम खलील अहमदच्या नावावर आहे, ज्याने २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध ३ षटकांत ६५ धावा दिल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.