IPL 2022: सलग दुसऱ्या वर्षी गोव्याच्या सुयशला बंगळूरच्या टीममध्ये एंट्री

गोव्याचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याच्यावर सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल संघाने विश्वास दाखविला आहे.
IPL 2022
IPL 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याच्यावर सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल संघाने विश्वास दाखविला आहे. रविवारी बंगळूरमध्ये झालेल्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) 30 लाख रुपयांत आपल्या संघात घेतले आहे. सुरवातीला त्याच्यावर 20 लाख रूपयांची बोली लावण्यात आली होती. (IPL Auction 2022 Updates: Suyash from Goa enters Bangalore team for the Second Time in row)

IPL 2022
RCB, KKR आणि Punjab Kings च्या कर्णधार पदाची कमान 'या' खेळाडुंच्या हाती

देशांतर्गत क्रिकेटमधील (Cricket) सय्यद मुश्ताक अली टी-20, विजय हजारे करंडक एकदिवसीय, तसेच 25 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत मी चांगली कामगिरी केली होती. सध्याचा फॉर्म लक्षात घेता, आयपीएलसाठी आणखी एका वर्षासाठी संधी मिळेल असे मनोमन वाटत होते, परंतु आरसीबी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवेल असे वाटले नव्हते. गतवर्षीच्या स्पर्धेत या संघासमवेत मी होतो. आयपीएल स्पर्धेत खेळलो नाही, तरीही मी उपयुक्त योगदान देऊ शकतो असे त्यांना वाटले असावे आणि त्यामुळेत मला त्यांनी लिलावात प्राधान्य दिले असावे. आरसीबीने पुन्हा निवडल्यामुळे माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे,’’ असे 24 वर्षीय सुयश याने अहमदाबाद येथून सांगितले. गोव्याचा रणजी संघ सध्या तिथे विलगीकरणात आहे.

मॅचविनिंग खेळी

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 स्पर्धेत गोव्याने विजेत्या तमिळनाडूला 7 विकेट राखून हरविले. त्या लढतीत सुयशने 24 चेंडूंत एक चौकार व तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या. ‘‘ती खेळी निर्णायक होती. नव्या मोसमात मी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही लक्ष केंद्रित करताना अष्टपैलूत्वाला न्याय देण्यास प्राधान्य दिले आहे. एकदिवसीय स्पर्धेतही मी चांगली फलंदाजी केली. सध्या आगामी रणजी स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी झाल्यास आयपीएल स्पर्धेपूर्वी आवश्यक आत्मविश्वास उंचावेल,’’ असे सुयश म्हणाला. 25 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत सुयशने गोव्याचे नेतृत्व केले व संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

IPL 2022
सचिनच्या पत्नी गोव्यातील मत्सोद्योगाच्या प्रेमात

चौथा गोमंतकीय

स्वप्नील अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स), शदाब जकाती (चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात लायन्स) आणि सौरभ बांदेकर (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) यांच्यानंतर आयपीएल स्पर्धेसाठी करार मिळणारा सुयश प्रभुदेसाई चौथा गोमंतकीय क्रिकेटपटू आहे. बांदेकर वगळता स्वप्नील व शदाब आयपीएल सामने खेळले आहेत.

‘‘बंगळूर संघात गतवर्षी विराट कोहलीकडून खूप काही शिकता आले. विराट कामगिरी उंचावण्यासाठी घेत असलेली मेहनत, खेळात पूर्ण झोकून देण्याची वृत्ती, फलंदाजीतील त्याची तंत्रशुद्धता, त्याची विजयी मानसिकता, उत्कटता यापासून मला खूप मोठा अनुभव मिळाला. माझ्यासाठी विराटचा सहवास फार मौल्यवान आणि मार्गदर्शक ठरला.’’

- सुयश प्रभुदेसाई, गोव्याचा क्रिकेटपटू

किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com